आष्टी
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावासाठी शिंपोरा ते खुंटेफळ
साठवण तलाव या पाईपलाईन कामाच्या निविदेसंबंधी आमदार धससाहेब यांनी दाखवलेले पत्र
म्हणजे " मेहनत करे मुर्गा..और अंडा खाये फकीर " अशी अवस्था आहे असे प्रतिपादन
आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.आष्टी येथे संपर्क कार्यालयामधील पत्रकार परिषदेमध्ये
आ.आजबे बोलत होते.यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, माजी
जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाकाडे,जगन्नाथ
ढोबळे उपस्थित होते.खुंटेफळ साठवण तलावासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी जलाशयातून
शिंपोरा येथून थेट पाईपलाईनद्वारे पाणी खुंटेफळ साठवण तलावामध्ये सोडण्याच्या योजना
कामाच्या निविदेचे पत्र उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते आपण प्राप्त केले आहे. अशा आशयाच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्मा यांनी
प्रसिद्ध केल्या आहेत.त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित
केल्याचे त्यांनी सांगत आ.आजबे पुढे म्हणाले की,खुंटेफळ साठवण तलावासाठी उजनी
जलाशयातून खुंटेफळ साठवण तलावासाठी शेडगाव पेडगाव पासून पाणी बोगद्याद्वारे तीन
ठिकाणाहून खुंटेफळ साठवण तलावामध्ये आणण्या बाबतची अंदाजपत्रके तयार असताना आमदार
झाल्यानंतर आपण शेतकरी असल्यामुळे बोगद्याद्वारे आणि कालव्याद्वारे संपूर्ण पाणी
खुंटेफळ साठवण तलावात येण्याआधी गळती मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल हे लक्षात
आल्यानंतर लगेचच बोगदा आणि कालव्याद्वारे पाणी आणण्याऐवजी शिम्पोरा येथून थेट
पाईपलाईन द्वारे पाणी नेल्यास १०० टक्के पाणी तलावापर्यंत पोहोचण्यास मदत होईल या
विचाराने आपण थेट पाईपलाईनचाच ध्यास घेऊन या कामाबाबत पाठपुरावा केल्यानंतर १४००
कोटी रु.किमतीच्या कामाची मंजुरी मिळाली होती.मात्र महाविकास आघाडीच्या
सत्तांतरानंतर हे काम रद्द करण्याचे पत्र कुणी दिले ? हे सांगण्याची गरज नाही
त्यानंतरच्या कालावधीमध्ये जे सत्तेवर होते त्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये या
कामाला मंजुरी का आणली नाही


? असा अप्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी निर्देश
केला.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण या कामाबाबत पाठपुरावा केला असून
वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे पूर्वी मंजूर झालेले काम रद्द केले नसते तर आज हे
काम ५० टक्के पर्यंत झाले असते आणि आज कामाला गती मिळाली असती सुरुवातीला १४०० कोटी
रु किंमतीचे हे ज्यादा किंमतीचे आहे असे सांगितले गेले परंतु आता हे मंजूर झालेले
काम देखील १४०० कोटी रु.चेच आहे हे कसे ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला
आमदार सुरेश धस यांचे खुंटेफळ साठवण तलाव निर्मितीमध्ये निश्चितपणे श्रेय आहे परंतु
त्या वेळच्या अंदाजपत्रकानुसार त्यामध्ये पुरेसे पाणी येणार नव्हते या सुधारित
अंदाजपत्रकात प्रमाणे थेट पाईपलाईन द्वारे १.६८ टीएमसी एवढे पूर्ण क्षमतेचे पाणी या
तलावामध्ये येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडेदेखील पत्र
दिलेले आहे.ही योजना माझ्या एकट्याची नसून आ.सुरेश धस,माजी आमदार भीमराव धोंडे आणि
सध्या शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आ.साहेबराव
दरेकर यांना देखील याचे श्रेय आहे.या थेट पाईपलाईन योजनेची निविदा आणि मंजुरीनंतर
या योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही मान्यवरांच्या हस्ते या योजनेच्या
शुभारंभ करून यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने आष्टी तालुक्यातील गोरगरीब शेतकरी
आणि जनतेसाठी कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी पाणी मिळावे यासाठी आष्टी
तालुक्याच्या हक्काचे उर्वरित ४ टीएमसी पाणी मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न
करण्याची गरज आहे असेही शेवटी आ.आजबे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या