Ticker

6/recent/ticker-posts

डिझेल घेऊन निघालेला टँकर गरम होऊन पेटला अन् जळुन भस्मसात झाला.

आष्टी.मुंबई येथून बीडला डिझेल घेऊन निघालेला टँकरचालक मराठवाडी फाट्यावर टायर गार होण्यासाठी थांबुन चहा पिण्यासाठी थांबला आणि पाठीमागील टायर फुटून इलेक्ट्रिक शॉटसर्किट होऊन डिझेलचा टॅकर पेटल्याची घटना दि.
१९ आक्टोबर रोजी मध्यरात्री अहमदनगर ते पाथर्डी रोडवरील मराठवाडी बसस्थानकजवळ घडली.मुंबईवरून बीडला २५ हजार लिटर डिझेल घेऊन निघालेला टँकर क्रमांक एम.एच २०,जी.सी.०८९१ गरम झाल्याने टायर थंड होण्यासाठी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील बसस्थानकाजवळ थांबवून चालक चहा पित असताना.अचानक पाठीमागील टायर फुटून ईलेक्ट्रीक शॉर्टसर्कीटने टॅकरला आग लागली. आतमध्ये झोपलेल्या सहकारी मित्राला खाली ओढत त्याचे प्राण वाचवले.ही घटना अहमदनगर ते पाथर्डी मार्गावरील आष्टी तालुक्यातील मराठवाडी बसस्थानकाजवळ येथे दि.१९ आक्टोबर रोजी मध्यरात्री घडली.चालक संतोष पोपट सोनवणे,(वय ३८) रा.खंडाळा ता.वैजापूर, जिल्हा छञपती संभाजीनगर,सहकारी किरण प्रकाश आहेर हे दोघेही सुखरूप आहेत.टँकर डिझेलसह जळाले आहे.ही घटना समजाताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे,पोलिस अंमलदार शिवदास केदार,चालक बाळासाहेब जगदाळे,रोकडे,सिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहमदनगर महानगर पालिकेचे तीन अग्निशमन बंब,नगरपरिषद पाथर्डी येथील एक अग्निशमन बंब,आष्टी आष्टी नगर पंचायतचा एक बंब अशा पाच बंबाने आग विझविण्यात यश आले.परिस्थितीनुसार टप्प्याटप्याने वाहतुक खुली केली.पहाटे पाच वाजता आग पुर्ण विझविण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या