आष्टी.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात
आला आहे.यासाठी दि.५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.यासह ३ हजार ८० रिक्त पदांच्या
पोटनिवडणुकां साठी देखील मतदान होणार आहे.यात आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा
समावेश आहे.कोयाळ,रुईनालकोल सांगवी आष्टी,धिर्डी या चार गावांचा समावेश
आहे.महाराष्ट्रातील एकूण २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची,२
हजार ९५० सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि १३० थेट सरपंचपदाच्या रिक्त
जागांसाठीची निवडणूकीची घोषणा आज करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दि.५
नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे.राज्य निवडणक आयक्त
यु.पी.मदान यांनी ही घोषणा केली.संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता
लागू झाली आहे.६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक
कार्यक्रम पत्रिकेनुसार दि.१६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे
दाखल करता येतील. त्यानंतर दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी
होईल.ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दि.२५
ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी ३ वाजल्यानंतर निवडणूक
चिन्हांचे वाटप करण्यात येईल.यात कोयाळ, रुईनालकोल,सांगवी आष्टी,धिर्डी या चार
गावांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या