Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी. बीड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांच्या एकुणच पत्रकारितेतील लेखनाची दखल घेत तसेच त्यांच्या नवरत्न या पुस्तकातील गुणवत्ता पडताळून अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांंच्या हस्ते रविवार दि.८ आक्टोबर २०२३ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय प्रशासन सेवा डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आ.संग्रामभैय्या जगताप,नाशीकचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर,माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे,चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे,अहमदनगर महानगरपालीकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे,अहमदनगर मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे,सभागृह नेता विनीत पाऊलबुध्दे, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, शिर्डीचे प्रबोधनकार भाऊ थोरात,डॉ.विजय भंडारी हे उपस्थित राहणार आहे. या पुरस्काराबद्दल पत्रकार उत्तम बोडखे यांचे बीड जिल्हाभरातून साहित्य प्रेमी गुंनीजनांकडून अभिनंदन होत आहे.पत्रकार उत्तम बोडखे यांचे नवरत्न हे विविध अंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकणारा अप्रतिम ग्रंथ आहे.विविध संत,महंत, कर्तुत्ववान व्यक्ति तसेच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वैशिष्ट्यांनी हा नटलेला ग्रंथ आहे. नवरत्न या पुस्तकास वाचकांची मोठी पोच पावती आहे.अनेकांनी या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिल्या तर आ.सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर, संपादक अजितदादा वरपे,अनंत हंबर्डे,प्रा. बिभिषण चाटे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, दत्ताभाऊ काकडे,विजय गोल्हार,विक्रम पोकळे, नामदेव राऊत,प्रा.विनोद ढोबळे
,आष्टी तालुका पत्रकार संघ,सर्व पदाधिकारी सदस्य तसेच बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.बोडखे यांच्या नवरत्न लेखसंग्रह पुस्तकाची दखल घेतली असून शब्दगंध साहित्य परिषदेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे अशी माहिती शब्दगंधाचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या