
आष्टी.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बीड -अहमदनगर राज्य रस्त्यावर आष्टी शहरातील विविध भागात हम रस्त्यावरच जनावरांचे टोळके निवांतपणे फिरत असून यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत असून वेळ वाया जाण्यासह मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असून यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
आष्टी हे शहर अहमदनगर बीड राज्य रस्त्यावरील प्रमुख तालुक्याचे ठिकाण आहे.अनेक शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, पंचायत समिती,बसस्थानक आदीसह विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि मोठमोठी व्यापारी केंद्र या मार्गावर आहेत.त्यामुळे मोठी वर्दळ या रस्त्यावर सातत्याने दिसून येते.पुणे मुंबई साठी जाणारी मराठवाड्यातील विविध भागातील प्रवासी वर्ग खाजगी वाहने आणि एसटी ने या मार्गावरूनच प्रवास करतात परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या राज्य रस्त्यावर जनावरांचे अनेक टोळके मधोमध निवांत पणे चालताना दिसून येत आहेत.यामुळे वाहनांना संत गतीने अनेक वेळ चालावे लागत असल्याने वेळ वाया जात आहे तसेच प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून पादचाऱ्यांनाही याचा त्रास उद्भवत आहे.एवढेच नाही तर यामुळे अनेक वेळा यापूर्वी या राज्य रस्त्यावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने या मोकाट जनावरा संदर्भात निश्चित नियमावली तयार करून यावर मार्ग काढावा अशी मागणी आष्टीतील सुजाण जेष्ठ नागरिकांसह विविध घटकांमधून पुढे येत आहे.
0 टिप्पण्या