Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड येथे "स्वच्छता ही सेवा-२०२३ " या उपक्रमाला प्रतिसाद

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 'स्वच्छता हि सेवा-२०२३ हा कार्यक्रम पुणे येथील श्रीगणेश कंन्स्ट्रकशन आणि धनेश्वर कंन्ट्रक्शन कंपनी यांंच्या संयुक्त विद्दमाने जामखेड येथे रविवार दि.१ आक्टोबर रोजी राबवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक अंतर्गत, राज्य मार्ग ५४८ डी जामखेड ते सौताडाचे ठेकेदार धनेश्वर कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि पुणे येथील श्रीगणेश कंन्स्ट्रकशन यांचे संयुक्त विद्यमाने जामखेड येथे राबवण्यात आला. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील, धनेश्वर कन्स्ट्रक्शनचे नरेद्र गांगोले (प्रोजेक्ट डायरेक्टर),सचिन पवार (प्रोजेक मॅनेजर),सुरेश मगदुम,आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.एल.डी.ढेपे, अॕथोरिटी इंजिनियर ईकाम व्हेंचर शिलाजीत मंडल,प्रवीण उगले,सर्व इंजिनियर, सुपरवायझर तसेच कामगार आदी उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग सा.बां.विभाग नाशिक ,मे.धनेश्वर कंट्रक्शन प्रा लि.आणि श्री गणेश कंट्रक्शन कंपनी,इकाम व्हेन्चर,आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान जामखेड यांचा संयुक्त " स्वच्छता ही सेवा -२०२३" हा कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाला जामखेड शहरातील नागरिक
,कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने सकाळी १० वाजता केले.त्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रा.एल.डी.ढेपे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देताना सांगितले की,आपल्या परिसरातील स्वच्छता करणे हे आपले जिम्मेदारी आहे आपला परिसर स्वच्छ असेल तर आपणास निरोगी आरोग्य लाभेल असे सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या