Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील शासकीय आयटीआय येथे "स्वच्छता ही सेवा " या उपक्रमाला मोठा प्रतिसाद

आष्टी. १ऑक्टोबर २०२३ रोजी "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत रोजी आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे शासकीय आयटीआय महाविद्यायातर्फे स्वच्छता अभियान सकाळी १० ते ११ या वेळेत राबविण्यात आले.या कार्यक्रमाला आयटीआयचे प्रशिक्षणार्थी कर्मचारी त्याचबरोबर आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी त्यासोबत नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने सकाळी १० वाजता केले.त्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयामधील कचरा सर्वांनी जमा केल्यानंतर तो वाहून नेण्यासाठी आष्टी नगरपंचायतीने घंटागाडीचे सुविधा उपलब्ध करून दिली.आयटीआयकडून राबवण्यात आलेल्या या प्रभावी कार्यक्रमाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांनी कौतुक केले.या उपक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या समारोपावेळी आष्टी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जी.बी. हडतगुणे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देताना सांगितले की,आपल्या परिसरातील स्वच्छता करणे हे आपले जिम्मेदारी आहे आपला परिसर स्वच्छ असेल तर आपणास निरोगी आरोग्य लाभेल असे सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या