

शेतकरी कुटुंबात ग्रामीण भागात लहानाचे मोठे होत आष्टी तालुक्यातील कडा येथील
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी,बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर थेट
जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ होण्याचा सन्मान डॉ.राम अण्णासाहेब औटे याला मिळाला
आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत एक दैदिप्यमान इतिहास रचल्याच्या भावना
व्यक्त होत आहेत. त्याचे राज्य आणि देशभर कौतुक होत आहे.डॉ. राम अण्णासाहेब औटे हा
आष्टी तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच प्रत्येक
घटनेत चिकित्सक पाहण्याची त्याची वृत्ती आणि स्वभाव असल्याने प्राथमिक, माध्यमिक
शिक्षणात ही त्याने अत्यंत आवडीने शिक्षण घेतले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कडा
येथील श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत घेतले. घरची परिस्थिती
अत्यंत नाजूक आणि हलाखीची होती शेतकरी कुटुंब असल्याने अत्यंत सर्वसामान्य
परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान होते परंतु प्रचंड जिद्द, चिकाटी आणि
आत्मविश्वासाच्या बळावर हे क्षितिज त्याने गाठले आहे.डॉ.राम औटे याने उच्च शिक्षण
एमएससी जैवतंत्रज्ञान अहमदनगर जिल्ह्यातील लोणी याठिकाणी पूर्ण केले. त्याच विषयात
त्याने पुढे पीएच.डी.चे शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले.डॉ.राम औटे याने आल्हनवाडी
ते कॅन्सरवरील जागतिक दर्जाचे संशोधन केले आहे.त्याच्या या संशोधनाची जागतिक
पातळीवर नोंद घेण्यात आली असून त्याच्या संशोधनाचा उपयोग कॅन्सरसारख्या अत्यंत
भयानक जीवघेण्या आजारावर औषध निर्मितीसाठी होणार आहे. संशोधनासाठी तब्बल २० कोटी
रुपयांचे पॅकेज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहे.या त्याच्या
बौद्धिक आणि कौशल्यपूर्ण मेहनतीचे देश आणि राज्य पातळीवर कौतुक होत आहे.आष्टी
तालुक्यातील कडा येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव दानवे,
उपप्राचार्य संजय धोंडे, सर्व प्राध्यापक,कर्मचारी बांधवांनी, विद्यार्थी यांनी
डॉ.राम औटे यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या