आष्टी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक कदम यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.त्यांच्याजागी औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातून बीड जिल्हा पोलीस दलामध्ये नव्याने बदली होऊन आलेले संतोष खेतमाळस यांनी काल पदभार स्वीकारला आहे.यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना ते म्हणाले की,
यापूर्वी आपण गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागामध्ये आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय आणि नंतर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलामध्ये करमाड, खुलताबाद आणि स्थानिक गुन्हे शाखा येथे काम केलेले आहे.आष्टी पोलीस स्टेशन येथे सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम आणि कायद्याचा मान राखणाऱ्या सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असे सांगीतले.त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर ८८८८८२१५२५ सर्वांना देऊन कधीही कोणत्याही क्षणी माझ्याशी संपर्क करा असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या