Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचे वृक्षारोपणाच्या कार्यात अलौकिक कार्य ------- पोखरीत येथे शंभर टक्के झाडे जगवल्यास गावाच्या विकासासाठी २५ लक्ष रु निधी देणार --- आ.सुरेश धस

आष्टी शहराचे माजी नगराध्यक्ष माझे कट्टर समर्थक आणि मित्र असलेले रंगनाथ धोंडे यांचे "आष्टी शहर हरित शहर" करण्याचे स्वप्न आहे.हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गेली १० वर्षापासून आष्टी शहरात हजारो वड, पिंपळ व इतर वृक्ष लागवड केली आहे.त्यांनी फक्त झाडे लावली नाहीत तर त्या झाडांना ग्रीन गार्ड तसेच उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी देऊन हे झाडे जगवले आहेत. आज ही झाडे २० ते २५ फूट उंचीचे झाले आहेत. कोरोना काळात वृक्षाचे महत्व जनतेला कळालेले आहे. रंगनाथ धोंडे यांनी आष्टी शहरातच नव्हे तर कडा शहरातसुद्धा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केलेले आहे आणि झाडे लावून ते झाडे जगवली आहेत. आज त्यांच्या ६१ व्या. वाढदिवसानिमित्त आष्टी तालुक्यातील पोखरी या गावी १६१ वृक्षारोपण करून एक अभिनव उपक्रम राबवला आहे. या गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ही झाडे शंभर टक्के जर जगवली तर मी पुढील वर्षी या गावात येऊन गावाच्या विकासासाठी २५ लाख रुपयाचे निधी जाहीर करणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोखरी गावचे सरपंच अंगद शिंदे हे होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आष्टीचे माजी सरपंच नामदेव राऊत, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पोपटराव घुले,आष्टी नगरपंचायतचे सभापती सुरेश वारुंगुळे, आष्टी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, नगरसेवक किशोरमामा झरेकर, नगरसेवक शरीफ शेख, नगरसेवक शाम वाल्हेकर, संतोष रणसिंग, नगरसेवक अक्षय धोंडे ,धनश्री बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र शिंदे सर्व कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.धस म्हणाले,यापूर्वी या गावातील मंदिरासाठी मी १० लाख रुपये निधी जाहीर केला आहे आणि तो निधी दिलेलाही आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा मी १० लाख रुपये निधी देण्याचे घोषित करीत आहे. रंगनाथ धोंडे यांचे झाडे लावण्यात आणि ते झाडे जगवण्यात मोठे काम आहे. त्यांच्या या कामाचे आपण मनापासून कौतुक करत आहोत. रंगनाथ धोंडे यांची शंभरावी साजरी करण्याचा योग आपल्याला यावा. त्यांचा परिवार हा सधन आणि समृद्ध आहे.त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा भावना व्यक्त करीत असून रंगनाथ धोंडे यांचे भविष्यातील राजकीय सामाजिक आणि बँकिंग क्षेत्रात मोठे काम होवो अशा शुभेच्छा आ.धस यांनी यावेळी दिल्या. आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचे वृक्षारोपणाच्या कार्यात अलौकिक कार्य आहे. रंगनाथ धोंडे यांनी पोखरीत लावलेली झाडे शंभर टक्के जगवल्यास गावाच्या विकासासाठी आपण २५ लक्ष रु निधी देणार अशी घोषणा आमदार सुरेश धस यांनी केली. यावेळी पोखरी ग्रामस्थांनी आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचा सत्कार करून सन्मान केला. यावेळी सत्कारला उत्तर देताना रंगनाथ धोंडे म्हणाले की, झाडे लावण्याचे जे मी काम सुरू केले आहे. या कामाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे माझे नेते आमदार सुरेश धस हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सामाजिक, राजकीय, धार्मिक,सहकार आदी क्षेत्रात काम करीत आहे. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शनामुळेच मी या क्षेत्रात टिकून आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला त्यांनी न्याय दिला आहे. दोन वेळा आष्टी शहराचे नगराध्यक्षपद मला दिलेले आहे.त्यांचे आणि माझे हे कौटुंबिक संबंध आहेत राजकारणापलीकडे जाऊन आमची मैत्री आहे. त्यांच्या राजकारणाचा उदय आणि माझ्या राजकारणाचा उदय एकाच वेळी झालेला आहे.आमदार सुरेश धस यांच्या प्रेरणेने मी सामाजिक काम करीत असून पोखरीकरांनी ही सर्व झाडे जगवली तर या गावाला आणखी पुढील वर्षी झाडे वृक्षारोपण करून मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे सांगत या गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने २१ हजार रुपयाची देणगी जाहीर केली. वाढदिवसानिमित्ताने रंगनाथ धोंडे यांचे माजी आ. साहेबराव दरेकर, जयदत्त धस, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, साहेबराव मस्के ,अमर निंबाळकर, सुरेश पवार, डॉ.सोपान निंबोरे, आबासाहेब खताळ, महेश शिंदे, रामशेठ मधुरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे, सभापती रमजान तांबोळी,संतोषशेठ मेहेर, विजयसेठ मेहेर, संजयसेठ मेहेर,विक्रम पोकळे, अरुण सायकड,बीडच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,आष्टीचे बळवंत मोरे,शिंदे (बीड),डॉ.शिवाजी राऊत,किशोरनाना हंबर्डे, माऊली जरांगे, विजय गोल्हार ,शफी सय्यद ,नाजीम शेख,अरुणभैय्या निकाळजे, मोहन जगताप, संदीप जगताप, राजेंद्र लाड ,पत्रकार ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, पत्रकार भीमराव गुरव, पत्रकार गणेश दळवी, पत्रकार प्रवीण पोकळे,सातपुते मामा,उपसरपंच वहाटुळे आदींनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पोखरी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या