आष्टी
शहरातील भाजीमंडई जवळ असलेल्या संत सावता माळी मंदिरात संत शिरोमणी सावतामाळी आणि
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संयुक्त पुण्यातिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा दि.१० ते १७ जुलै २०२३ या
कालावधीत होत आहे.या सप्ताहात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,संतकथा,हरिपाठ,
हरिकीर्तन व हरिजागर होणार आहे.सप्ताहात ह.भ.प.गणेश सुरेश धोंडे,किशोर आसाराम
डोमकावळे हे व्यासपीठ चालक म्हणून काम पाहणार आहेत तर ह.भ.प.रामदास डोरले
महाराज,ह.भ.प.आसाराम डोमकावळे आणि ह.भ.प. बाळासाहेब झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली
हा सप्ताह संपन्न होत आहे.या सप्ताहात ह.भ.प.बाळासाहेब महाराज झगडे
,ह.भ.प.पुष्पाताई जगताप महाराज,ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे,ह.भ.प.आदिनाथ महाराज
दानवे,ह.भ.प.गणेश महाराज सुडके यांचे हरिकीर्तन होणार आहेत. शनिवार दि.१५ जुलै रोजी
सुर्यास्ताच्या वेळी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यकालानिमित्ताने पुष्पवृष्टी
होणार आहे तर रात्री ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.रविवार
दि.१६ जुलै रोजी सुर्योदययाच्या वेळी संत सावतामाळी यांच्या पुण्यकालानिमित्त
पुष्पवृष्टी करण्यात येईल.रात्री ह.भ.प.निवृत्तीदादा महाराज बोडखे यांचे हरि कीर्तन
होणार आहे.सोमवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात ह.भ.प.निवृत्तीदादा
महाराज बोडखे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.महाप्रसादाची महापंगत यशवंत तुळशीराम
धोंडे यांच्यावतीने होणार आहे.रविवार दि.१६ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ६ यावेळेत
दिंडी प्रदक्षिणा होणार आहे.काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची
सांगता होणार आहे अशी माहिती सावता सेवा मंडळाने दिली. सप्ताहातील पोष्टर जाहिरात
सौजन्य आष्टी येथील बोडखे प्रेसचे आहे.दि.२१ आगस्ट २०२३ रोजी आष्टी ते मांदळी अशी
पायी दिंडी सोहळा होणार असल्याचेही संत सावता सेवा मंडळाने पत्रकारांना सांगितले.
0 टिप्पण्या