जैन मुनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आष्टी तालुका सकल जैन समाजाच्या वतीने
तहसीलदार यांना निवेदन. कर्नाटकमधील चिक्कोडीजवळच्या हिरेकोडीमधील नंदीपर्वत
आश्रमाचे जैन मुनी कामकुमारजी महाराज यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ
आष्टी तालुका सकल जैन समाजाच्या वतीने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच जैन
मुनींना संरक्षण देण्याची मागणी असणारे निवेदन आज तहसील कार्यालय आष्टी येथे
देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे जैन मुनी कामकुमारजी महाराज यांची 5
जुलै रोजी मध्यरात्री दोन समाज कंटकांनी अत्यंत निर्घृण पणे हत्या केली आहे.यामुळे
समाज भावना दुखावल्या गेल्या आहेत.सदरील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.तसेच जैन
मुनींना संरक्षण देण्यात यावे.अशा मागणीचे निवेदन आष्टी तालुका सकल जैन समाजाच्या
वतीने नायब तसीलदार बाळदत्त मोरे यांना देण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या
प्रमाणावर उपस्थित होते.
0 टिप्पण्या