कृ.उ.बा.समितीचे सभापतीचे बंधु कांदा व्यापारी तांबोळींची तामिळनाडूतील
व्यापा-याकडुन फसवणूक ----------------------------------------- झालेली फसवणूक सहन
करीत पदरमोडीने तांबोळींनी दिले शेतक-यांचे पैसे
------------------------------------------
आष्टी तालुक्यातील कंगा येथील कांदा
व्यापारी बबलुशेठ तांबोळी यांना तामिळनाडू येथील कांदा व्यापाऱ्याने विश्वासात घेऊन
कांदा गोण्या पाठवल्याचे पैसे दिले नाही. पैशाची मागणी केली असता देण्यास टाळाटाळ
केल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे समजताच आष्टी पोलिस ठाण्यात तामिळनाडू
येथील व्यापाऱ्यावर १ कोटी २० लाख ५३ हजाराची फसवणूक झाल्याची फिर्याद देण्यात आली
आहे. २०१७ ते १८ या कालावधीत माल ट्रांन्सपोर्ट करणारे कंपनी मार्फत तांबोळी यांची
श्री मनि पदवतन्त्र पेनियार मालक मनी ट्रेडर्स १६५, भजन कोईल स्ट्रिट, जुना पलायम
रा. तामिळनाडू- ६३२५०५ यांच्या सोबत ओळख झाली होती. मी त्यांना त्यांच्या या मोबाईल
७४८३९८७९५६, ९८४३८७११४२ नंबरवर कॉल करून कांद्याच्या मालाबाबत सांगितले तेव्हा
त्यांनी मला माल पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मी माझे फर्म मार्फतने दि.१०.
डिसेंबर २०१७ ते दि. २४ डिसेंबर २०१८ पर्यंत कांदा माल यामध्ये भरून पाठविला त्याची
नोंद माझे फर्मचे खतावणीमध्ये नमुद आहे. कोणत्या तारखेस किती माल कोणत्या ट्रक
द्वारे पाठविण्यात आला किती रकमेचा माल होता व किती रक्कम प्राप्त झाली यांच्या
नोंदी आहेत .माझे खतावणी पुस्तिका प्रमाणे मी सोबत तक्ता दिला आहे. मी सदर
कालावधीमध्ये कांदा गोणी एकूण ८८५०२ बिलावरील वजनाप्रमाणे रक्कम रुपये ६.५१,७०,८२५
रु चा पाठविला आहे. मी मनी ट्रेडर्सला पाठविलेल्या मालाची रक्कम रुपये ५.३१.०५.७७५
त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या खात्यावरून माझ्या खात्यावर जमा केलेली आहे.
त्यांचेकडुन मला रक्कम रु १ कोटी २० लाख ६५ हजार ,५३ रूपये येणे बाकी आहे. या
रकमेबाबत मी त्यांना वेळोवेळी फोन करून विचारणा केली असता ते गोडीगुलाबीने
उडवाउडवीचे उत्तरे देत आले आहेत.माझे पैसे घेण्यासाठी मी ट्रेडिंग कंपनीचे मालक
यांचेकडे जाऊन आलो. ते माझी बाकी असलेली स्वकम रु १ कोटी २० लाख, ६५ हजार ५३ रूपये
देण्यास टाळाटाळ करत आहेत .तरी श्री.मनी पेनीवार मालक मनी ट्रेडर्स श्री मनि पदवत
पनियार मालक मनी ट्रेडर्स १६५, भजन कोई स्ट्रिट जूना 4 . पलायन, बेलोर, तामिळनाडु
६३२५०५ यांचे मालक यांनी एकुन रक्कम १ कोटी २० लाख ६५ हजार ५३ रूपये ही दिली नसुन
माझ्या व्यापारात मोठा तोटा झाला आहे. तसेच मी ज्या शेतकरयाकडून कांदा घेतला होता
त्याची रक्कम मी स्वतः दिली आहे. वरील ट्रेडिंग कंपनीचे मालक यांनी माझा विश्वास
संपादन करून फसवणूक केलेली आहे.तरी श्री मनि पदवतन्न पेनियार, मानी ट्रेडर्स १६५,
भजनी स्ट्रिट जुना पलायम तामिळनाडु ६३२५०५ याच्या विरोधात कडा येथील कांदा व्यापारी
हाफीज नुर महंमद तांबोळी रा.कडा ता.आष्टी याच्या फिर्यादीवरून मनी पेनीवार मालक मनी
ट्रेडर्स श्री मनि पदवत पनियार मालक मनी ट्रेडर्स १६५, भजन कोई स्ट्रिट जूना 4 .
पलायन, बेलोर, तामिळनाडु याच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा गुरूवारी दाखल केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक अजित चाटे करीत आहेत.
0 टिप्पण्या