बीड लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी आष्टी न्यायालयातील वकील संघाच्या सुविधेसाठी
" ई "- कोर्ट लायब्ररी साठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
आष्टी येथील न्यायालयीन वकील संघास सदिच्छा भेट देण्यासाठी त्या आष्टी येथे आल्या असता.वकील संघाने त्यांचा सन्मान केला यावेळी त्यांचे समवेत समाजसेवक विजय गोल्हार,आष्टी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साहेबराव म्हस्के,युवानेतृत्व जयदत्त धस, आणि भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीतील जनसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी महा
जनसंपर्क अभियान अंतर्गत बुद्धिवंतांशी संवाद व्हावा या हेतूने आष्टी वकील संघाला आपण भेट देत असल्याचे सांगितले.आणि त्यावेळी सर्व सदस्यांनी आष्टी न्यायालयातील वकील वर्गासाठी उपयोगी असलेल्या ही कोर्ट लायब्ररी साठी १५ लक्ष रु.निधी आवश्यक असून आपल्या खासदार निधीतून हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली त्यावर तात्काळ ही विनंती मान्य करून लवकरच " इ " -कोर्ट लायब्ररी साठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले याचबरोबर आष्टी येथील वकील संघाने आष्टी येथील न्यायालयाची नवीन वास्तुचे बांधकाम झालेले असून या ठिकाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होईल अशा सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या असल्याने आष्टी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे कार्यालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले असता याही बाबत आपण संबंधितांकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी आष्टी वकील संघ सदस्य विधीज्ञांना दिले
आहे
0 टिप्पण्या