Ticker

6/recent/ticker-posts

लेखणीत क्रांती करण्याची ताकद ... माजी आ.भीमराव धोंडे ---------- लेखक प्रा.बिभिषण चाटे यांच्या " आर्टिकल फ्रेम" ची प्रशंसा....

विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करीत असतात.या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली ,त्यांचा दृष्टिकोन यासंदर्भाने मांडणी केली जाते. प्रा.बिभिषण चाटे यांच्या माध्यमातून केलेले सर्व स्पर्शी लिखाण हे प्रशंसनीय आहे असे कौतुक माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले. लेखक प्रा.बिभिषण चाटे यांनी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्तृत्वावर अध्यात्मिक दृष्टिकोनातून टाकलेला प्रकाश " फोटो फ्रेम " च्या माध्यमातून आज आषाढ एकादशीच्या पवित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुपूर्त करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्यासह हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासिका तथा नेट सेट पीएचडीधारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक प्रा.आशा फड उपस्थित होत्या.माजी आ.भीमराव धोंडे पुढे म्हणाले की, लेखणीतील दृष्टिकोन,संशोधन, कर्तुत्वाची बाजू,निवडलेले क्षेत्र, अविस्मरणीय क्षण,एखाद्या व्यक्तिमत्त्वाने त्या क्षेत्रात मिळवलेले अनुभव या संदर्भाने केलेली मांडणी महत्त्वाची असते.ही मांडणी अत्यंत कौशल्यपूर्ण लेखणीत प्रा.चाटे यांनी मांडल्याचे ते म्हणाले.यावेळी उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण, प्रा.डा.जी.पी.बोडखे,प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या