Ticker

6/recent/ticker-posts

तरूणांनी गैरप्रकार घडवून आष्टीत तेड निर्माण होईल असे कृत्य करू नये ----नायब तहसीलदार राजेंद्र पवार...


कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबचे फोटो सोशल 
मिडीयावर टाकुन तसेच फोटो दाखवुन नाचन्याचे प्रकार ताजे 
असतानाच आष्टी शहरातील आझादनगर येथील एका तरुणाने 
औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेऊन “ 
बाप तो बाप रहेगा " असा मजकूर टाकल्याने प्रचंड तणाव 
निर्माण झाला. सर्व हिंदू संघटना एकत्र येत सदरील तरूणावर
 आष्टी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करत हिंदू 
संघटनेच्यावतीने आज आष्टी बंदचे अवाहन करण्यात आले 
आहे.याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शुभम शहाराम 
लोखंडे (वय-२३ वर्षे) रा.माळीगल्ली आष्टी यांच्या फिर्यादीवरून 
दि.८ जुन रोजी दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास मी बस स्टॅण्ड 
आष्टी येथे असतांना माझा आयफोन मोबाईलमध्ये इंन्स्टाग्राम 
नावाचे सोशल मिडीया अपलीकेशन पाहत असतांना मला 
आष्टी येथील रहीवाशी आणि माझ्या परीचयाचा जैद अय्युब
 सय्यद यांचे इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्याच्या 
अकाऊंटवर लबेका ग्रुप आष्टी या पेजवर औरंगजेब यांचा 
फोटो आणि त्या फोटोला “बाप तो बाप रहेगा" असे वाक्य
 टाकलेले दिसुन आले औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा 
शत्रु असल्याचा ईतिहास असुन छञपती शिवाजी महाराज 
हे महाराष्ट्र राज्याचे दैवत मानले जातात परंतु तरी देखली 
इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर औरंगजेबाचे फोटो टाकुन व 
त्यावर “बाप तो बाप रहेगा" अशा आशयाचे वाक्य टाकुन 
धार्मीक भावना दुखवल्या असुन दोन समजामध्ये तेड निर्माण
 होईलअसे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली.
 त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यदच्या विरोधात भारतीय 
दंड संहिता १८६० नुसार कलम २९५(A),५०५(१)(ब)नुसार 
आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास 
एपीआय भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत.

 आष्टीतील नागरीकांनी शांतता राखावी - नायब तहसिलदार 
राजेंद्र पवार
-----------------------------------
 कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरीकांनी, तरूणांनी 
गैरप्रकार घडवून आष्टीत तेड निर्माण होईल असे कोणतेही कृत्य 
करू नये जर कुणाला काही कृत्य आढळून आले तर पोलिस 
प्रशासन,महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असे अवाहन 
नायब तहसिलदार राजेंद्र पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या