देशाला देशाला काही माणसे कलंक आहेत तर काहींचे कधीच पोट भरत
नाही राष्ट्रहितासाठी प्रत्येकाने देशप्रेमाचे वृत्त हाती घ्यावे आवाहन
श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज
गहिनीनाथगडकर यांनी आज येथे केले.तसेच पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी संपूर्ण जगभर आपल्या कणखर,कुशल आणि बुद्धिमान
नेतृत्वाचा परिचय दिला आहे. मोदी यांचा जागतिक पातळीवर
गौरव केला जात आहे.पंतप्रधान मोदी हे आपल्या भारत देशाला
ईश्वराची मोठी देणगी असलेल्याचे प्रतिपादन माजी आमदार
शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयातील सभागृहात पंतप्रधान
मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील योजनांबाबत आयोजित
संत संमेलन व कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते यावेळी.
आष्टी,पाटोदा, शिरूरचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी ज्येष्ठ
भाजपाने ते भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
नेतृत्वाखाली आष्टी येथे आज सोमवारी भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा
घेण्यासाठी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक क्षेत्रातील महारती
उपस्थित होते.प्रारंभी संत महंतांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या
कार्याला मान्यवरांनी वंदन करून या संत संमेलनाची सुरुवात
केली. महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर आपल्या उद्बोधनपर
भाषणात म्हणाले देशाला आजही काही माणसे कलंक आहेत तर
काहींचे पोट कधीच भरत नाही स्वतःपेक्षा समाजासाठी कार्य
करा कपडे घातले म्हणून कोणी संत होत नाही देश प्रेमीचे
वृत्त प्रत्येकाने हाती घेतल्यास खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा घडेल
असे सांगितले.गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड कीर्तनकार ह.भ.प.
रामकृष्ण रंधवेबापु यांनी अत्यंत रसाळ ओगवत्या भाषाशैलीत
धार्मिक क्षेत्रातील मोठेपण व्यक्त केले.राष्ट्राच्या जडणघडणीत
संतांचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अनेक
दृष्टांतातून सांगितले म्हणून ते म्हणाले जनसेवेचे काम मोदीजी
करीत आहेत.आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी असून जनतेला
सुख संपदा देण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचे दिसून येते.
माजी आमदार भीमराव धोंडे यांचे भाषण अत्यंत अभ्यास पूर्ण
झाले ते म्हणाले की, बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील महाराज
मंडळींचे अध्यात्मिक कार्य अत्यंत मौल्यवान आहे गेल्या कित्येक
वर्षापासून चा त्यांचा धार्मिक प्रचाराने प्रसाद समाज परिवर्तनसाठी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एकोपा आणि ऐक्यासाठी सदैव पुढाकार
घेतलेला राहिला आहे मोदीजी यांचे नऊ वर्षातील कार्य
हिमालयाएवढे उत्तुंग असल्याचा गौरव करीत धोंडे ते म्हणाले
की,केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील निवडणुकीतील विजयात
त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याणकारी योजनांचा महत्त्वाचा वाटा होता.
सुरुवातीला केंद्रातील सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी मोठा निर्णय घेतला जनधन योजनेअंतर्गत ज्या
अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थित जोडण्याची
मोहीम सुरू करण्यात आली आणि ती पूर्णपणे यशस्वी ठरली
सन २०२०-२०२२ मध्ये या खाते अंतर्गत ४५ कोटीहून अधिक
बँक खाते उघडण्यात आली तसेच पंतप्रधान गरीब कल्याण
योजना द्वारा ८० कोटी लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण
योजना रेशन मिळत आहे यामध्ये प्रत्येक नागरिकाला पाच किलो
धान्य दिले जाते या योजनेवर आतापर्यंत सरकारने ५.९१ लाख
कोटी रुपये खर्च केले आहेत.तसेच भारत हा कृषिप्रधान देश
असून या भारत देशातील शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून पी .
एम .किसान सन्मान निधी योजना सन २०२०-२०२१ मध्येमोदी
सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ६०००
रुपये जमा करते ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात
मध्ये दिली जाते आतापर्यंत १२ हप्ते वर्ग केले आहेत.
तसेच सर्वात महत्त्वाची असलेली हर घर जल योजने अंतर्गत
ग्रामीण भागात देखील वाड्यावस्त्यांवर नळ योजनेद्वारे पाणी
मिळण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनांचे पाणी
घरोघरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या योजनेची कामे सुरू
आहेत.पंतप्रधान आवास योजना शहरी आणि पंतप्रधान आवास
योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत शहरात आणि ग्रामीण भागात
देखील गोरगरिबांना घरे बांधता आली यामध्ये नरेंद्र मोदींचा फार
मोठा वाटा आहे उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला चुलीच्या
धुरापासून मुक्ती
मिळालेली असून अल्प किमतीत गॅस कनेक्शन मिळालेले असल्यामुळे माता-भगिनी सुखी झालेले आहेत आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गोरगरिबांना
मोफत इलाज मिळत असून या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या
कोट्यावधी पर्यंत पोहोचले असल्यामुळे गोरगरिबांना चांगले
आरोग्यदायी उपचार मिळत आहेत गोरगरिबांना मोफत रेशन
मिळत असून देशातील ८० कोटी लोकांना याचा लाभ मिळत
असल्यामुळे मोदी पंतप्रधान मोदींच्या राजकीय विरोधकांनी
कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही आणि
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार
येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या सरकारने केलेल्या कामाबाबत कार्यकर्त्यांनी प्रत्येक
नागरिकापर्यंत या कामाची माहिती देण्याची आवश्यकता
असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये याबाबत
जनतेमध्ये जागृती करण्याची आवश्यकता असल्याची त्यांनी
यावेळी सांगितले अशा प्रकारचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना
उद्देशून केल यावेळी बोलताना गहिनीनाथ गडाचे मठाधिपती
हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गड गहिनीनाथ गडकर यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करून स्वातंत्र्य मिळवताना
वल्लभाई पटेल यांचे कार्य आणि आता पंतप्रधान मोदींचे कार्य हे
संस्मरणीय असून कधीही विसरणार नाही असे सांगत गेली ७०
वर्षे चोरी करणारे यांचे मन भरलेले नाही त्यांना अजून चोरी
करण्याची अपेक्षा आहे असे काँग्रेसचे नाव न घेता उद्देशून सांगितले.
या संत संमेलनास रंधवेबापु, आदिनाथ आंधळे महाराज,
त्रिविक्रमानंद शास्त्री,निवृत्ती महाराज बोडखे, श्रीहरी पुरी महाराज,
नीळकंठ तावरे महाराज, ब्रम्हचैतन्य महाराज तावरे, पुष्पाताई
जगताप महाराज,सस्ते महाराज, रविंद्र तवले महाराज आदी
५० ते ६० संत ,महंत, महाराज,भाजपचे पदाधिकारी,अजयदादा धोंडे,
अभयराजे धोंडे,वाल्मिक निकाळजे, सुवर्णाताई लांबरुड,डॉ.शैलजा गर्जे, अनुरथ सानप,उपसभापती पांडुरंग नागरगोजे,सावता ससाणे,विठ्ठलराव लांडगे,सतिषमामा झगडे,पांडुरंग गावडे,एन.टी.गर्जे, उपसभापती नामदेव धोंडे, संदीप नागरगोजे,आण्णासाहेब लांडगे गणेश धोंडे, दत्ताभाऊ बोडखे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रस्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के यांनी केले.संचलन शंकर देशमुख यांनी केले.



0 टिप्पण्या