उत्तम बोडखे, आष्टी.
----------------------------
जगाच्या पाठीवर कोणीही निरंतर सेवा देत नाही.अगदी सूर्य चंद्र पाऊस हे निरंतर सेवा देत नसून काही मर्यादित काळाकरता सेवा देतात परंतु आई हे एकमेव व्यक्तिमत्व असे आहे की ते निरंतर सेवा करते.निरंतर उपकार करते.मानवी जीवन व्यवस्थेत महिलांचे स्थान अढळ असते. ज्या कुटुंबात संस्कार संपन्न शांत संयमी ज्येष्ठ महिलांचा वावर असतो त्या कुटुंबात सदैव आनंद आणि चैतन्याचा सुगंध येतो असे भावपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार तथा कीर्तन केसरी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे गेवराईकर यांनी केले.आष्टी तालुक्यातील पांढरी येथील अशोक हंबर्डे आणि दिलीपदादा हंबर्डे यांच्या मातोश्री श्रीमती ममताबाई जामदेवबापू हंबर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज सोमवारी ५ जून रोजी पांढरी येथे ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे गेवराईकर यांचे कीर्तन झाले. त्यावेळी संत तुकाराम यांच्या अभंगाची निरूपण करताना महिलांच्या मानवी जीवनातील अपरिहार्यतेच्या अनुषंगाने विविध दृष्टांत सादर करत स्त्रीचे मुल्ये प्रतिपादन केले.हंबर्डे परिवारातील ज्ञान,संस्कार,शांतता, आदरातिथ्य आदि मूल्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचा गौरव महाराजांनी केला.श्रीमती ममताबाई हंबर्डे या कुटुंबात सदैव चांगुलपणा, सत्यता या गोष्टींना महत्त्व देत होत्या. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबामध्ये सदैव सकारात्मकता आणि आध्यात्मिक क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे.वै.जानदेवबापू तुळजापूर देवीचे कट्टर भक्त होते.या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हंबर्डे परिवाराने केलेला हा ज्ञानयज्ञ आहे. संतांचे विचार प्रचार आणि प्रसार करण्याचे त्यांचे धोरण अत्यंत चांगलपणाचे आहे.संतांचे, ईश्वराच्या कृपेने त्यांच्या परिवारात ममताबाईंच्या शांत विचारांचे आणि प्रगतीचे कार्य होत राहील असा परमेश्वराच्या साक्षीने संदेश दिला.विश्वाला ज्ञान देणा-या ज्ञानेश्वर माऊलींना संसार रडवितो तर तुमची आमची काय गत आहे.आई सर्वोच्च न्यायालय तर आहेच.माफ करणारे सर्वात मोठे स्थान आहे.आई आणि संत हेच फक्त सदैव उपकार करणारे आहेत असेही साखरे महाराज म्हणाले.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, देविदास धस,विक्रम पोकळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित या कीर्तन सोहळ्याला माजी आ.भीमराव धोंडे ,माजी आ.साहेबराव दरेकर,बीड जि.प.चे माजी सदस्य देविदास धस,विठ्ठलराव बनसोडे, बबनराव झांबरे, हनुमंत थोरवे, आदिनाथ सानप,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,डॉ.मधुकर हंबर्डे ,सतीशआबा शिंदे, सुखलाल मुथा ,अमोल तरटे, राजेंद्र गोल्हार,विक्रम पोकळे,डॉ.चंद्रकांत ढेरे,दिलीप काळे,अंकुश धस ,महादेव कोंडे,आर.डी.शिंदे, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अविशातं कुमकर,शरद गर्जे, अशोक पोकळे आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर,विविध संस्थांचे पदाधिकारी,आष्टी तालुक्यातील नातेवाईक मित्रमंडळी आणि मान्यवर,महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.नानासाहेब महाराज भोगाडे यांनी केले..







0 टिप्पण्या