Ticker

6/recent/ticker-posts

वादळाने शहाजीराव भोसले यांच्या शेतातील डाळिंब बागेचे प्रचंड नुकसान



आष्टी तालुक्यातील रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ब-याच ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे.यामध्ये खानापूर येथील तावरे कुटुंबांचे घर पडले तर पिंपरीआष्टी येथील शहाजीराव भोसले यांच्या अडीच एकर क्षेत्रातील तीन वर्षाची डाळींब बागेतील झाडे कोलमडुन जमीनदोस्त झाली.यामध्ये जवळपास १ हजार झाडामध्ये ९० टक्के झाडांचे नुकसान झाले आहे.अंदाजे या बागेचे वार्षिक उत्पन्न १९ लक्ष असुन आज एवढे मोठे नुकसान शेतकरी शहाजीराव भोसले यांचे झाले आहे.हातातोंडाला आलेला घास वादळी वाऱ्यासह पावसाच्या नुकसानी हिसकावून घेतला आहे.तलाठी व कृषी सेवकांनी पंचनामा केले असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकार दरबारी मदत मिळावी अशी मागणी भोसले कुटूंब व शेतकरी वर्गातून केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या