कुस्तीच्या खेळामध्ये जगभरात नावलौकिक मिळवणा-या महिला पैलवान दिल्लीमध्ये उपोषणाला बसले असताना एक महिन्यापासून दुर्लक्ष होत आहे. ते वेदनादायी असून हा स्त्री जातीचा तर अपमानच आहेच.त्याचप्रमाणे देशासाठी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचासुध्दा अपमान आहे. अशी खंत व्यक्त करुन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे या शिक्षकाने या महिला कुस्तीपटूंना आपला पाठींबा जाहिर केला आहे.विजय आमटे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहिर केलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.दिल्लीमध्ये सुरु असलेले महिला पैलवानांचे आंदोलन सध्या चर्चेत आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रातील सरकार विरुध्द असंतोष निर्माण होताना दिसत आहे.देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या या महिला खेळाडूंना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द आवाज उठवावा लागतो.त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपच्या खासदाराला वाचवण्यासाठी केंद्रातील सरकार निर्लज्जपणाचा कळस गाठते हे कोणालाही पटलेले नाही.विशेष म्हणजे देशातील महिला खेळाडू आंदोलन करत असताना त्यांना महाराष्ट्रातून फारसा पाठींबा कोणीही दिलेला नाही.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलकांना आपला संपुर्ण पाठींबा दिला आहे. राज्यातील सर्वच नेते,खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते गप्प असताना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले विजय आमटे यांनी मात्र आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार गाजवत या महिला खेळाडूंना आपला पाठींबा जाहिर केला आहे. ही लढाई मुलींच्या आत्मसन्मानाची आणि देशाच्या स्वाभिमानाची आहे. इथे कोणताही पक्षाभिनिवेष न ठेवता सर्व समाजाने भारतमातेच्या या मुलींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असेही आमटे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या