उत्तम बोडखे, आष्टी.
----------------
आ.राम सातपुते हे अतिशय गरीब कुटुंबातून आणि
संघर्षातून आणि माता पित्याच्या..विशेषतः आई जिजाबाईंच्या कष्टातून उभे राहिलेले
नेतृत्व आहे.त्यांचे मातृछत्र हरपले आहे. त्यांच्या आई जिजाबाई यांनी अतिशय
कष्टातून राम यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना घडवले. हा त्या मातेचा आपण सर्वांनी
आदर्श घेतला पाहिजे. मी आमदार राम सातपुते यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात
सहभागी आहे अशी भावपूर्ण श्रद्धांजली आ.श्रीकांत भारतीय यांनी डोईठाण येथे
अंत्यविधी समयी बोलताना श्रद्धांजली अर्पण केली. आ.राम सातपुते यांची घरची
परिस्थिती बेताची होती.प्राथमिक शिक्षण डोईठाण येथे घेत असताना कन्हैयालाल मंडले या
शिक्षकांनी त्यांच्यातले गुण फिरून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
शाखेतून संस्कार केले महाविद्यालयीन शिक्षण घेताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील
संस्कार अंगी असल्यामुळे त्यांनी पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना अखिल
भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि सलग दोनवर्षे
प्रदेशमंत्री राहिल्यामुळे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक
असल्यामुळे त्यांनी त्यांचेवर अखिल भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेशाची जबाबदारी
दिली. त्यानंतर राम सातपुते यांनी मागे पाहिले नाही आणि आपली प्रगतीकरण पक्षाची एक
निष्ठा राऊत पक्षासाठी अतोनात परिश्रम करून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आणि
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आले.एक विशेष गोष्ट अशी की,
ज्या विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत.त्या मतदारसंघात त्यांच्या
आई-वडिलांनी ऊस तोडलेला आहे त्याच भांबुर्डे गावात त्यांच्यावर लहानपणीचे संस्कार
केले गेले होते त्याच विभागाचे ते विधानसभा सदस्य आहेत ही विशेष बाब आहे माळशिरस
तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील
विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले.शंकर
सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे १९९० ते १९९५ पर्यंत ऊस तोडणीचे काम
करत होते.माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम सातपुते
यांनी पुणे गाठले. त्यावेळीच त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला.तेथूनच
त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय
क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद
देण्यात आले. राम सातपुते यांना मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाते. राम
सातपुते यांचे आई वडील विठ्ठल व जिजाबाई सातपुते या आष्टी तालुक्यातील डोईठाण या
त्यांच्या गावी छोट्याशा घरामध्ये राहत असत. त्यांचे वडील परंपरागत असलेला व्यवसाय
या गावातच करत होते. त्यांच्या मातोश्री आई जिजाबाई व वडील विठ्ठल सातपुते यांनी
ऊसतोड मजूर म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये काम केलेले होते.योगायोगाने यास
तालुक्याचे नेतृत्व करण्याचे भाग्य या ऊसतोड मातोश्रीच्या मुलाच्या नशिबी आले. आई
जिजाबाई यांनी आपण गरीबीतून आलेलो आहोत गरिबांची सेवा आपण केली पाहिजे ही संधी
आपल्याला ईश्वराने प्राप्त करून दिली आहे असे राम सातपुते यांना नेहमी सांगत. अशा
या आदर्श जिजाबाईंचा वृद्धापकाळाने निधन झाल्यामुळे मंगळवार रोजी डोईठाण तालुका
आष्टी येथे हजारोंच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळीआ.श्रीकांत
भारतीय,आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, विजय
गोल्हार,जयदत्त धस,लालाभाऊ कुमकर, भाऊसाहेब लटपटे, डॉ.शिवाजी राऊत, प्राचार्य
हरिदास विधाते, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, सतीशाआबा शिंदे,सागर महाराज,
बोराडे,सोपानकाका महारनोर,विवेकानंद लातुरकर,संदीप पाटील,कान्हेय्या मंडले यागा
मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.अंत्यविधीस अजय धोंडे,लालासाहेब
कुमकर,अण्णासाहेब चौधरी,श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे अमोल तरटे,काकासाहेब शिंदे,संजय
गाढवे,श्याम भोजने,सुनील सानप, शशांक मिसाळ, संपत गाडे पाटील,आर.पी. चव्हाण,अशोक
गर्जे,अरुण कांबळे, किशोर हंबर्डे, वशिष्ट महाराज तरटे,युवराज वायभासे,सुंदरलाल
गर्जे ,अभय गर्जे,विकास सोनवणे, रेवनाथ खाडे, रमेश ढगे,पत्रकार प्रविण पोकळे, संतोष
दाणी, पत्रकार गणेश दळवी आदि सामाजिक, राजकीय ,धार्मिक मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या