Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी'मुळे कुर्बानी पुढे ढकलली,कड्यातील मुस्लिम बांधवाचा कौतुकास्पद निर्णय...



    एकादशी दिवशीच आलेली आहे लाखो 
  वारकरी पंढरीची वारी करत आहेत.याकारणाने        यावर्षी बकरी ईद दिवशी देण्यात येणारी 
   कुर्बानी दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय कडा 
  येथील मुस्लिम बांधवांनी शांतता कमीटीच्या            बैठकीत जाहिर केला.दरम्यान यावर्षी बकरी 
  ईद हा सण आषाढी एकादशीच्या दिवशी 
  आल्याने सर्व समाज बांधवांनी सामाजिक 
  सलोखा राखत बकरी ईद शांततेत साजरी               करण्याचे आवाहन आष्टीचे सपोनि विजय 
   देशमुख यांनी केले.कडा येथे बकरी ईदच्या             निमित्ताने आयोजित शांतता कमिटीच्या 
  बैठकीत ते बोलत होते.यावेळी सरपंच 
   युवराज पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे           सभापती रमजान तांबोळी,माजी सरपंच
   अनिलतात्या ढोबळे, प्रा.डा.मुस्ताक पानसरे,
  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे,रवींद्र ढोबळे        आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना
  देशमुख म्हणाले की,सालाबादप्रमाणे यावर्षी 
  दि.२९ जून रोजी बकरी ईद सण साजरा होत 
  आहे. त्याचप्रमाणे त्याच दिवशी देवशयनी 
   आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होत आहे. दो      दोन्हीही उत्सव समाज बांधवांनी शांततेत
  साजरे करून एकात्मतेचा संदेश द्यावा.
    याप्रसंगी सालाबाद प्रमाणेबकरीच्या दिवशी          देण्यात येणाऱ्या कुर्बानी या दुसऱ्या दिवशी 
  देण्यात येतील,असा एकमुखी निर्णय मुस्लिम          बांधवांनी जाहीर करताच सर्वांनी त्या 
  निर्णयाचे स्वागत केले.याप्रसंगी ठकाराम               दुधावडे,शेख आरिफ,दीपक गरुड,
  काकासाहेब कर्डीले,अंजुम पानसरे, ग्रामस्थ      पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या