Ticker

6/recent/ticker-posts

एकेकाळी महाराष्ट्रभर गाजलेला लोकनाट्य तमाशाचा मालक शाहिर तुकाराम काळे आता अर्थिक विवंचनेत






                ------ उत्तम बोडखे.

घटनेचे शिल्पकार शब्दरूप करणारे लोककलावंत शाहीर काळे यांच्यासारखी माणसे तळहाताच्या फोडासारखी जपावी लागतील तरच संस्कृती जपली जाईल असे वातावरण आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील कै.दादा कोंडके यांच्या हस्ते १९८० साली.लोकनाट्य तमाशा मंडळाचे उद्‌घाटन गले ते आष्टीचे प्रसिद्ध कलावंत शाहीर तुकाराम काळे यांनी तमाशा कला खऱ्याअर्थाने जोपासली आहे.जामखेड येथे लोकनाट्याच्या पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ कै.सुधीर फडके,रामदास फुटाणे,अनंत माने,राम-लक्ष्मण या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. आष्टीचे लोककलावंत शाहीर काळे १९८४ साली बी.ए.झाले.त्यानंतर सामाजिक प्रबोधनात  स्वतःला झोकून घेतले.लोकनाट्य तमाशा मंडळ सुरु करुन अवघ्या पाच वर्षात बंद झाले.काळे यांनी नंतर बाबा आमटे यांच्या “ भारत जोडो " अभियानात भाग घेऊन श्रीरामपूर ते पंजाब अशी पदयात्रा केली.१९८९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सोमनाथ प्रकल्प,भामरागड येथील शिबिरात बाबा आमटे यांच्या समवेत काळे दोन महिने राहिले.या काळात राष्ट्रभत्क्तिपर गीतांची गीतमालाच त्यांनी पुस्तकरुपाने प्रकाशित केली.शाळा महाविद्यालयातून क्रार्यक्रम सादर केले. लोकनाट्य मंडळ चालवित असताना दोन ट्रक,एक कार अशा थाटात असणारा कलावंत आता मात्र: हलाखीचे जीवन जगत आहे.१४ एप्रिल २००२ पासून डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने अखंड भारत आणि अखिल महाराष्ट्रात शाहीर काळे यांनी टाळ - मृदंगाच्या गजरात " भीमराज-भिमाई " हे कीर्तन सादर करणे सुरु केले आहे. मूळचे आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील रहिवाशी शाहिर काळे सलग १० वर्षे ग्रामपंचायतचे सदस्य होते. शाहिरी शिवाय इतर अनेक ठिकाणी त्यांनी समाजसेवेत हिरारीने सहभाग घेतला. नाटकातून राष्ट्रीय एकात्मता,अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषय प्रभावीपणे मांडले.आतापर्यंत काळे राज्यात चार हजार प्रयोग केले आहेत. जादूचे प्रयोग, गीतगायन, पोवाडा गायन आणि आता भारतरत्न . डॉ.आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारीत " भिमराज- भिमाई " 
हे कीर्तन. यामुळे हा कलावंत ग्रामीण भागात लोकप्रिय झाला आहे. ज्या कलावंताला नाशिक येथे शासनाने गौरविले त्याच कलावंतावर आज मात्र उपासमारीची पाळी आली आहे.कलावंतांना राजाश्रय देण्याची परंपरा असलेल्या या महाराष्ट्रात लोककलावंत शाहिर तुकाराम काळेसारखी कलावंत मंडळी तळहाताच्या फोडासारखी जपली पाहिजे तरच संस्कृती टिकणार आहे.एकेकाळी महाराष्ट्रभर गाजलेला आष्टीचा लोकनाट्य तमाशाचा मालक शाहिर तुकाराम काळे आता अर्थिक विवंचनेत आहे...

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या