Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरीघुमरी येथे श्री म्हसोबा यात्रा उत्सवानिमित्त भव्य निकाली स्पर्धेत मल्लांनी मैदान गाजवले! ...




 उत्तम बोडखे,आष्टी

   

युवा कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह.. म्हसोबा महाराज की जय..... चा प्रचंड जयघोष... राज्यभरातून आलेले नामांकित मल्ल,कुस्ती शौकीन..आणि यात्रा उत्सवात सहभागी झालेले भावीक भक्त यांच्यासह विविध क्षेत्रातील आलेल्या तरूणाईच्या जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे  आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथील यात्रा उत्सव 'न भूतो न भविष्यती' ठरला! प्रथेनुसार गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथे शनिवार दि.६ मे रोजी श्री म्हसोबायात्रा उत्सव मोठ्या दिमाखास संपन्न झाला.यात्रेमध्ये विविध खेळण्या, गोड पदार्थांची दुकाने, पाळणे लहान मुलांसाठी गमती जमती,संगीतमय कार्यक्रम हॉटेल्स दुकाने यांनी पिंपरीघुमरी येथील म्हसोबायात्रा उत्सव परिसर अक्षरशः रंगून गेला होता.यात्रेनिमित्त झालेल्या भव्य निकाली कुस्ती मैदानास आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस, कुस्ती प्रेमी व पैलवान माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, राष्ट्रवादीचे नेते सतीशआबा शिंदे,महाराष्ट्र   केसरी सईद चाऊस,पत्रकार उत्तम बोडखे,विनोद ढोबळे,मुस्ताक पानसरे,अनिलशेठ पांडुळे, तानाजी अनभुले आदिनी भेटी दिल्या.या यात्रा उत्सवात झालेल्या भव्य निकाली कुस्ती स्पर्धा रोमांचकारी ठरल्या राज्यघरातून मतदान आणि उपस्थिती लावली. एक हजार रुपयापासून थेट तब्बल ५१ हजार रुपयांच्या अंतिम कुस्तीपर्यंत कुस्त्या संपन्न झाल्या. १०००, २०००,५०००, ७०००,११०००, २१००० अशा मोठ्या बक्षिसांची रक्कम होती.पिंपरीघुमरीचे सुपुत्र कै.पैलवान रामभाऊ गोरे आणि कै.पैलवान विठोबा उढाणे यांच्या आशीर्वादाने हा कुस्ती उत्सव समितीचा भव्य सोहळा संपन्न झाला.आखाड्याचे पूजन पैलवान सतीशआबा शिंदे, माजी आ.दरेकर नाना  व मान्यवरांनी केले.कुस्ती स्पर्धेसाठी पंचानी अत्यंत चोख भूमिका निभावली.आ.बाळासाहेब आजबे ,आ.सुरेश धस,ज्येष्ठ भाजप नेते माजी भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर नाना यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी या उत्सव समितीच्या कार्याला शुभेच्छा संदेश व धन्यवाद दिले.श्री म्हसोबा यात्रा उत्सव अत्यंत आनंदमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी पिंपरी घुमरीचे लोकप्रिय सरपंच दादा पांडुळे ग्रामपंचायत सदस्य तसेच जेष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते यांनी मोठे परिश्रम घेतले. दुर दुरून आलेल्या पैलवानांचे आणि यात्रा उत्सव समितीत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामस्थां तर्फे आभार मानण्यात आले.यावेळी सरपंच दादा पांडुळे ,डा.संदीप पांडुळे, अंकुश पांडुळे,अनिल पांडुळे,तानाजी अनभुले,नवनाथ जगताप,लक्ष्मण परकाळे,अंबाजी पांडुळे, अशोक परकाळे पाटील,संदीप नवले,ज्ञानदेव गांगर्डे,सचिन पांडुळे, परमेश्वर ऊढाणे यांनी कुस्ती बक्षीस दिले.हे कुस्ती मैदान यशस्वी पार पडण्यासाठी  काग्रेस नेत्या सौ.मिनाक्षीताई पांडुळे,सरपंच दादा पांडुळे,दिलिप ऊढाणे, अशोक ऊढाणे,परमेश्वर जगताप,भरत गोरे,सुनील पांडुळे,देवराव परकाळे,लक्ष्मण झगडे,राजु परकाळे,मधुकर पांडुळे,परसराम परकाळे,संपत अनभुले,बाळु पांडुळे,नवनाथ जगताप,कानिफनाथ जगताप, महादेव वारुळे,गोरख वारुळे,अशोक परकाळे,प्रताप पांडुळे, ताराचंद पांडुळे आदी युवक ,ग्रामस्थ,कुस्तीप्रेमी यांनी परिश्रम घेतले.यावेळी बहारदार  आणि रोमहर्षक सुत्रसंचलन धनंजय खवळे यांनी केले.

 

-------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या