
आष्टी (प्रतिनिधी)
टॅलेंट कॉर्पोरेशन सोलुशन्स लिमिटेड पुणे व कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या
वतीने शनिवार दि.३१ जानेवारी रोजी भव्य नोकर-भरती मेळाव्याचे आयोजन कडा येथील महाविद्यालयात केले आहे.या नोकर भरती मेळाव्याचे उदघाटन डॉ. अजयदादा धोंडे यांचे हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभयराजे धोंडे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पुणे येथील टॅलेंट कॉर्पोरेशन सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ऑपरेशन मॅनेजर
विशाल उबाळे, फियाट कंपनीचे
अजय खेडकर,
टी.एस.पी.एल.ग्रूप एच.आर.हेड धनश्री मॅडम,अहिल्यानगर येथील कायनेटिकचे
तुषार निंबाळकर,
हे निवड समिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा परीक्षा व रोजगार संधी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने परिसरातील बेरोजगारी लक्षात घेऊन गरजू सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दहावी, बारावी,आयटीआय, डिप्लोमा,कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.टेक.,नर्सिंग, एमबीए किंवा सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, नागपूर,अहिल्या नगर, छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यातील हायर, एल.जी.टाटा, जेसीबी,हिताची, फियाट,
ऑटोमोबाईल्स, हेअर अप्लायन्स इंडिया प्रा.लि. कायनेटिक इंजिनिअरिंग,
ईपीरोम कंपोनेट अशा ५० एमएनसी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.नामांकित कंपन्यांमध्ये ६०० पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. मेस व बस सेवा मोफत आहे.किमान वेतन १७ ते २४ हजार पर्यंत आहे.अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील अशी माहिती आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी दिली.
या मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे
समन्वयक डाॅ.शाम सांगळे,स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय नरसाळे,
व सहसमन्वयक डॉ. भीमराव गावडे यांनी केले आहे.
------------
0 टिप्पण्या