आष्टी(आष्टी)
तालुक्यातील हाजीपुर सारख्या ग्रामीण भागातून हलाकीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन १९९४ साली शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील ही मुले घडली पाहिजेत.चांगले संस्कार देखील देऊन हजारो विद्यार्थी घडविण्यासाठी मागिल ३२ वर्षापासून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक कल्याण वाल्हेकर सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेत शिक्षण महर्षी माजी आ. भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या राज्यस्तरीय गंगाई - बाबाजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील अतिशय सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानार्जनाच्या कार्यातून मागील ३२ वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी घडवले डॉक्टर,वकील,इंजिनियर, राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे हजारो विद्यार्थी नावलौकिक असून त्यांच्या दिलेल्या ज्ञानार्जनामुळे तरुण पिढी घडली आहे.अनेकांचे आयुष्य घडवणारे आदर्श शिक्षक तालुक्यात आप्पा या नावाने परिचित आहेत. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असून अभ्यासाची ही त्यांना गोडी लागत आहे.त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी येथे गेली १६ वर्षापासून शिक्षक म्हणून न्यायदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. मागिल ३२ वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी घडविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ शिक्षक कल्याण वाल्हेकर यांचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,प्रशासन अधिकारी डाॅ.डी बी.राऊत, डॉ.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे,संदीप नन्नवरे, सागर वाघुले,पंडित शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे,माजी सरपंच विठ्ठल राख, हाजीपुर समस्त ग्रामस्थ राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व पंडित शाळेचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शाळेचे विद्यार्थी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
चौकट
-----------
विद्यार्थीप्रिय शिक्षक कल्याण वाल्हेकर सर तुमच्या ज्ञानाने आम्हाला प्रेरणा मिळाली
ज्येष्ठ शिक्षक कल्याण वाल्हेकर सर यांनी आमचे फक्त करिअर नव्हे तर जीवन घडवले आहे.त्यांनी नोकरीचा उपयोग केवळ उपजीविकेचे साधन न मानता, शिक्षण हे जीवन जगण्याचे साधन मानले.त्यांनी शिक्षणप्रसारावर वैयक्तिक विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले.त्यांनी केवळ ज्ञानच दिले नाही,तर जीवनाची मूल्ये आणि संस्कारांची शिकवणही दिली. वाल्हेकर सर तुमच्या संयम आणि ज्ञानाने आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली पुस्तकी ज्ञान न घेता, खऱ्या अर्थाने जगण्यासाठी तयार केल्याने आज हजारो विद्यार्थांचे आयुष्य जेष्ठ शिक्षक वाल्हेकर सरांमुळे घडले आहे.
----विठ्ठल राख
( माजी विद्यार्थी माजी सरपंच तथा उद्योजक)

सरपंच तथा उद्योजक).
0 टिप्पण्या