Ticker

6/recent/ticker-posts

धामणगाव,घाटा पिंपरी, दादेगाव,डोंगरगण,टाकळी, कडा,शिराळ टाकळसिंग, हिंगणी या आठ गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकुन घेतल्या मनोजदादा जरांगे पाटीलांनी...व्यथा ऐकुन गहिवरले मनोजदादा... पुरामध्ये वाहून गेलेले जनावरे पंचनामा करण्यासाठी कुठून सापडून आणायचे ? ..... मनोजदादा जरांगे पाटील ..... पुरातील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी ..... मनोजदादा जरांगे पाटील ...... आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिल्या भेटी

आष्टी (प्रतिनिधी) कडा व परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी आलेल्या पुरामुळे शेतकरी व व्यावसायिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोजदादा जरांगे पाटील यांनी मंगळवारी आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्तांची पाहणी करताना ते बोलत होते. आष्टी तालुक्यातील धामणगाव,घाटा,पिंपरी, दादेगाव,डोंगरगण,टाकळी, कडा,शिराळ टाकळसिंग, हिंगणी येथील पूरग्रस्तांच्या व्यथा मनोजदादा जरांगे पाटील यांनी ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,पंचनामे करताना शेतकऱ्यांचे सरसकट नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करावा .शासनाकडून मदत कशी मंजूर करायचे हे मी पाहून घेतो असा धीर शेतकऱ्यांना दिला. आष्टी तालुक्यातील कडा येथील पुरामध्ये अडकलेल्या सापते कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबाने पुरात अडकल्यानंतर काय हाल झाले हे जाणून घेताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर कडा येथील अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांचे पुरामुळे दुकाने वाहून गेले आहेत.यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व व्यवसायिकांची तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी पाटील यांनी केली.पुरामध्ये शेकडो जनावर आहे वाहून गेले आहेत.याचे पंचनामे करताना पशुधन अधिकारी हे मृत जनावर दाखवून त्याचे पोस्टमार्टम करावे लागेल असे सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करताच त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, पुरामध्ये वाहून गेलेले जनावरे पंचनामा करण्यासाठी कुठून सापडून आणायचे ? याचा शासनाने विचार करून शेतकरी जे संख्या सांगेल त्या संख्येप्रमाणे नोंद घेऊन जनावरांची भरपाई देण्याची मागणी यावेळी केली. व्यवसाय करणाऱ्या व शेतकऱ्यांना खचून जाऊ न देण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. आपण पुन्हा नव्या उमेदीने व्यवसायाला व शेतीसाठी तयार राहावे असेही आवाहन मनोजदादा जरांगे पाटील यांनी केले. चौकट -------- आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी ढगफुटीसह अतिवृष्टी झाल्याने पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.या अतिवृष्टीमुळे धामणगाव येथील अफरोज बशीर शेख बागवान (वय ३५ वर्षे) हा तरुण धामणगावाच्या पुरामध्ये वाहून गेला.आज संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी धामणगाव येथे जाऊन निवासस्थानी भेट दिली.त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला.यावेळी माजी सरपंच संजय गाढवे,डाॕ.अकील सय्यद आदि उपस्थित होते. ------------------ चौकट ------------
पुरामध्ये वाहून गेलेले जनावरे पंचनामा करण्यासाठी कुठून सापडून आणायचे ? याचा शासनाने विचार करून शेतकरी जे संख्या सांगेल त्या संख्येप्रमाणे नोंद घेऊन जनावरांची भरपाई देण्याची मागणी यावेळी केली. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या