

आष्टी (प्रतिनिधी)
पवित्र पोर्टल फेस दोन मधून मुलाखती मधून राकेश उत्तम बोडखे
यांची लोकमान्य शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक पदावर निवड झाल्याबद्दल शिक्षण
क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.शासनाने पवित्र प्रणाली २०२४
मध्ये शिक्षकांची भरती टेट सीईटी व्दारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीना मेरीटनुसार
शिक्षक भरती केली होती.सन २०१०,सन २०१४ नंतर सन २०२४ साली प्राथमिक व माध्यमिक
शिक्षकांची भरती केली होती.त्यामध्ये राकेश बोडखे (एम.एस्सी,बी.एड.) शैक्षणिक
आहर्ता असलेल्या तरुणाची पवित्र पोर्टल फेज १ अंतर्गत सातारा जि.प.मध्ये प्राथमिक
शिक्षक म्हणून मार्च २०२४ रोजी निवड झाली होती.त्यानंतर पोर्टल फेज २ अंतर्गत राकेश
बोडखे यांना शैक्षणिक आहर्तेनुसार माध्यमिक गटात जाण्यासाठी संधी देण्यात आली.
सुदैवाने बीड जिल्ह्यातील लोकमान्य शिक्षण संस्थेची एकमेव पोर्टलवर जाहिरात होती.
त्यानुसार लोकमान्य शिक्षण या संस्थेला प्राधान्यक्रम देण्यात आला होता.
संस्थाध्यक्ष ॲड. हनुमंत थोरवे यांनी राकेश बोडखे यांची गणित व विज्ञान विषयाचे
माध्यमिक शिक्षक म्हणून निवड केली.राकेश बोडखे यांचे प्राचार्य रविकांत सुंबरे,
प्राध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वागत करुन अभिनंदन केले.राकेश
बोडखे सर हे अत्यंत हुशार बुद्धिमान आणि शिक्षण क्षेत्राची आवड असलेले
व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी प्रचंड अभ्यास मेहनत आणि जिद्दीच्या बळावर टेट परीक्षेत
गुण प्राप्त केले. विद्यार्थ्याना शिक्षणातून मूल्यात्मक शिक्षण देऊन राष्ट्रप्रेम
राष्ट्र जागृती आणि समता बंधुत्व ऐक्य सर्व धर्म समभाव त्या मूल्यांची जोपासना
करण्यावर त्यांचा भर असतो. लोकमान्य शिक्षण संस्थेत झालेल्या निवडीबद्दल त्यांनी
समाधान व्यक्त केले असून भविष्यात शाळेचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नतेवर
आपण भर देणार असून संस्कारमय शिक्षणासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास यावेळी नूतन
शिक्षक राकेश बोडखे यांनी व्यक्त केला आहे. ---------------- चौकट -------- राकेश
बोडखे हे आष्टी शहरातील असुन हे यश आपल्या अथक परिश्रमाने, योग्य नियोजनाने प्राप्त
केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले
आहेत.शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर,मित्रमंडळी आणि त्यांचे नातेवाईक सोशल मीडिया
आणि इतर माध्यमांद्वारे त्यांचे अभिनंदन करत आहेत. -------------------
0 टिप्पण्या