आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयाचे प्राचार्य वाय.यु.सय्यद आणि उपप्राचार्य बाबासाहेब कर्डीले यांची नियत
वयोमानानुसार सेवापूर्ती आज होत आहे. सय्यद सर व कर्डीले सर हे दोघेही माझे जवळचे
मित्र आहेत.या दोघांनीही शैक्षणिक गुणवत्ता व आदर्श विद्यार्थी घडविले आहेत.त्यांनी
अत्यंत निष्ठेने,प्रमाणिकपणाने शैक्षणिक कार्य केले असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस
यांनी केले. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील बाबासाहेब कर्डीले आणि वाय.यु.सय्यद
यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत
होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा जनता वसतीगृह संस्थेचे सचिव
विजयकुमार बांदल हे होते. प्रमुख पाहुणे संस्थाध्यक्ष अब्दुलभाई सय्यद,ह.भ.प.
आदिनाथ आंधळे,माजी आ.सुधीर तांबे,माजी आ. साहेबराव दरेकर,रमेशभाऊ पोकळे,कांतीलाल
चानोदिया, राजाभाऊ दरेकर, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,संजय वारे, परमेश्वर शेळके,
उध्दवबापु दरेकर, राजेंद्र गव्हाणे, ॲड.रमेश जंजीरे, राजेंद्र दहातोंडे, मनोज
धस,दत्ता चव्हाण,संजय काळे,पांडुरंग चव्हाण,आण्णा चव्हाण,राजाभाऊ शेळके, शोक
चव्हाण, जगन्नाथ ढोबळे,भगवान काळे,प्राचार्य उत्तम गव्हाणे,सय्यद युनूस,बन्शीभाऊ
पोकळे,डाॕ.राज शेख,कुमार शेळके, नामदेव शैळके, अंकुश चव्हाण, परमेश्वर गायकवाड,
चेअरमन बाळासाहेब शिंदे, चेअरमन बन्शीभाऊ पोकळे,शिरीषभाऊ थोरवे,पोपट घुले, गोरख
कर्डीले,नागेश कर्डीले,बाळासाहेब शेंदुरकर,अशोक लगड,प्रा.डाॕ.मुस्ताक पानसरे,नागेश
कर्डीले,चंद्रकात वामन,बापु शेळके, बिभिषण दिघे, श्रीनिवास पोकळे, सय्यद मुसा आदि
मान्यवर उपस्थित होते. आ. सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की,माझ्या चांगल्या व वाईट
दिवसात हे दोन्ही मित्र सहभागी असतात.कंत्राटी पध्दतीने यांना संधी देण्यात
यावी.फार कमी लोक सलग ३० वर्षे एकाच क्षेत्रात कार्यरत असतात. त्यापैकी सय्यद व
कर्डीले आहेत.पवार, मोहिते,विखे,मुंडे, ठाकरे,राणे,थोरात यांचे राजकारण ३०
वर्षापासुन घरात आहे.सतत कार्यात मग्न असणारा राजकरणात टिकतो.सर तुम्ही रिटायर्ट
झालात परंतु टायर्ड झालेले नाहीत.आता मलाही दोन्ही हक्काचे कार्यकर्ते मिळलेत असेही
आ.सुरेश धस म्हणाले. यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,कर्डीले सर व सय्यद
सर आज सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.शासकीय सेवा म्हटले की, सेवानिवृत्ती ही
आलीच.शैक्षणिक कामाऐवजी आता सामाजिक काम करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे.
या दोघांचे वय सेवानिवृत्ती इतके झाले असले तरी त्यांच्याकडे पाहिल्यास त्यांचे वय
इतके असावे असे वाटत नाही.सय्यद व कर्डीले कुटुंबीयांचा आमचा संबंध गेली ४०
वर्षापासूनचा आहे.कर्डीले कुटुंबियांचे अत्यंत चांगले संस्कार त्यांच्या मुलांमध्ये
आलेले असल्यामुळे बाबासाहेब कर्डीले सर यांनी देखील त्यांच्याच पावलावर पार ठेवून
अत्यंत निष्ठेने,प्रमाणिकपणाने आणि शैक्षणिक सेवा केलेली आहे.ही सेवा देत असताना
कर्डीले यांनी कोणालाही दुखावलेले नाही आणि कोणासमोर झुकलेदेखील नाहीत.सतत चांगले
विचार डोक्यात ठेवल्यामुळे ते आपल्या कर्तव्यामध्ये यशस्वी झालेले आहेत.त्यांनी
यापुढे आता स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या नात्याने मुक्तपणे सामाजिक
कार्यामध्ये सहभाग नोंदवावा कारण त्यांच्यासारख्या सुशील संस्कारात वाढलेल्या
व्यक्तींनी समाजासाठी काही वेळ काढावा कारण त्यांच्यासारख्या संस्काराची आज समाजाला
निश्चितपणे आवश्यकता आहे. त्यामुळे कर्डीले यांचे पुढील आयुष्य अत्यंत आरोग्यदायी,
आनंददायक वातावरणात जावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी दिगंबर चव्हाण,संदीप
राळेभात,नारायण राळेभात राहुल राळेभात,सतीश राळेभात,विनोद राळेभात,दिनेश
राळेभात,आबा साळुंखे,डॉ.सुपेकर, विनायक राऊत, अवधूत पवार, काकासाहेब कर्डिले, माजी
सरपंच दत्ता चव्हाण,संपत कर्डिले,सरपंच माऊली वाघ, उपसरपंच परमेश्वर कर्डिले,शहराम
कर्डिले आदि उपस्थित होते. यावेळी माजी आ.डाॕ.सुधीर तांबे, मनोज धस, धर्माचार्य
ह.भ.प. आदिनाथ आंधळे महाराज यांचे भाषणे झाली. संचलन ए.एम.पवार तर शंकर गाडे सर
यांनी आभार मानले.

------------------
0 टिप्पण्या