
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण
महर्षी भीमराव धोंडे यांची पुतणी आणि राजेंद्र आनंदराव धोंडे यांची मुलगी आदिती
धोंडे हिने सीएसआयआर- नेट या परीक्षेत ऑल इंडिया रँक ८६ ने उत्तीर्ण होत घवघवीत यश
संपादन केले आहे. आदिती राजेंद्र धोंडे ही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आष्टीमध्ये
घेऊन उज्वल यश संपादन करणारे गुणी विद्यार्थिनी आहे. खडतर परिश्रम घेण्याची तयारी
तसेच शांत,संयमी, आणि अभ्यासू विद्यार्थीनी म्हणून तिची ओळख आहे. अध्यापकांनी
सांगितलेल्या मार्गदर्शनासनुसार अत्यंत शिस्तबद्ध आणि परिश्रम घेऊन भविष्यात मोठे
पद प्राप्त करण्यासाठी व्यापक प्रदीर्घ ध्येय समोर ठेवून ते गाठण्यासाठी जिद्द,
आत्मविश्वास आणि त्यागाचा बळावर पुढे जाणारी विद्यार्थिनी अशी तिची ओळख
आहे.नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये सीएसआयआर नेट मध्ये देशपातळीवर ८६ क्रमांकाने
उत्तीर्ण होऊन तिने आष्टीचे नाव देशभर झळकवले आहे.या उज्वल देशाबद्दल तिचे अभिनंदन
माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे, विठ्ठलराव बन्सोडे,ज्येष्ठ पत्रकार
उत्तम बोडखे,डाॕ.सुनिल बोडखे,उपसभापती नामदेव धोंडे, डाॕ.डी.बी.राऊत, प्राचार्य
डाॕ.हरिदास विधाते, प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ, इंजि.पी.बी.बोडखे यांच्यासह
राजकीय, सामाजिक,धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी
केले आहे.
0 टिप्पण्या