Ticker

6/recent/ticker-posts

कुस्ती क्षेत्रातील गुरु-शिष्य आठवणीत रमतात तेव्हा ................ ८५ वर्षांचे पैलवान बाबासाहेब नालकोल आणि भीमराव धोंडे यांच्या लाल मातीच्या गप्पा रंगल्या!

आष्टी (प्रतिनिधी‌) दोन लिटर दूध,चार भाकरी कुस्करून..दोन तासाहून अधिक वेळ व्यायामशाळेत घामाचे पाठ गळेपर्यंत बलदंड शरीर करून कुस्तीचे मैदान मारून टाळ्या मिळवणारे गुरू पैलवान बाबासाहेब नालकोल आणि शिष्य भीमराव धोंडे यांच्यातील काल रंगलेल्या गप्पा आष्टी तालुक्यातील चर्चेचा विषय बनला. निमित्त होते स्व.बापूकाका आनंदराव धोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे! हा कौटुंबिक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भीमराव धोंडे यांचे एकेकाळचे कुस्तीच्या आखाड्यातील मार्गदर्शक गुरु बाबासाहेब नालकोल हे ८५ वर्षाचे माजी पैलवान यावेळी उपस्थित होते तर त्यांचे त्याकाळचे कुस्तीच्या आखाड्यातील पिळदार शरीराचे शिष्य आणि प्रत्येक ठिकाणी कुस्ती जिंकून टाळ्या मिळवत यश संपादन करणारे भीमराव धोंडे यांची यावेळी झालेली भेट.त्यामध्ये त्याकाळच्या विविध ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यातील चाललेल्या कुस्तीच्या फडातील गप्पा रंगल्या... बाबासाहेब नालकोल यांच्या विचार आणि कार्याची प्रेरणा घेऊनच पुढे भीमराव धोंडे यांनी आपल्या कारकिर्दीत तमाम युवकांना बलदंड शरीर आणि निरोगी आयुष्य लाभावे आणि जीवनात करिअर घडविले. खेळातुन पुढे येऊन असंख्य मित्र मंडळी जमा करीत राजकारणात प्रवेश करुन आपला नावलौकीक प्राप्त केला. आष्टी आणि विविध ठिकाणी व्यायाम शाळांची निर्मिती केली. यातून अनेक मल्ल तयार झाले आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी पोलीस मिलिटरी नेवी आदी सह ठिकाणी करिअर करून यशस्वी झाले. ---------------- .....राहिल्या त्या आठवणी! ----------------------- गुरुचा आदर करण्याची परंपरा शेवटपर्यंत भीमराव धोंडे यांनी जपली.साधा सरळ प्रमाणिक माणूस अशी ख्याती भीमराव धोंडे यांची. राजकारणात असून सुद्धा कायम टिकली आहे.हे वेगळेपण आहे.गप्पांच्या मैफिलीत बाबासाहेब नालकोल तल्लीन झाले...आणि उठताना त्यांनी 'गेले ते दिवस.. आणि आता राहायला फक्त आठवणी!' अशा शब्दात गप्पांच्या मैफीलीचा शेवट केला! -------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या