Ticker

6/recent/ticker-posts

कीर्तन केसरी वै.महादेव महाराज जगताप हे वारकरी संप्रदायातील " सिंह " होते ........ ह.भ.प.पांडुरंग महाराज गिरी

आष्टी (प्रतिनिधी) मरणाची चिंता भगवंताचे नामचिंतन संपविते.सहजस्थिती असणारे साधु संत असतात. आत्मबोधाने संसारातील दुःख नष्ट होत असते.अनन्य होऊन सदासवर्दा निरपेक्ष,निष्काम भावाने चिंतन करणाऱ्या भक्ताजवळ देव येऊन त्याची सेवा करतो.तनुत्यागाच्यावेळी, मृत्यावेळी वैफल्यता,विफलता येऊ देत नाही.आत्मबोध नावाचा विचार देतो.कीर्तन केसरी वै. ह.भ.प.महादेव महाराज जगताप हे निष्ठावान व निश्चयाचे महामेरु होते.कीर्तन केसरी वै.महादेव महाराज जगताप हे वारकरी संप्रदायातील " सिंह " होते असे ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी यांनी केले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कीर्तन केसरी वै.ह.भ.प.महादेव महाराज जगताप यांच्या ८ व्या. पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनसेवेत ते बोलत होते.यावेळी राजेंद्र धोंडे,गोरख महाराज झांबरे, अमोल महाराज बळे,अमोल भोसले, बबन बळे महाराज, रविंद्र महाराज तवले, शिवाजी महाराज जगताप, संभाजी जगताप, पत्रकार उत्तम बोडखे,आर.डी. शिंदे,निळकंठ खेडकर,अंबादास खेडकर आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक,शैक्षणिक व कृषि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प.गिरी महाराज म्हणाले की,वै.महादेव जगताप महाराज यांनी महाराष्ट्रात परमार्थ पेरला. भक्तीचा मळा त्यांनी फुलविला आहे. त्यांनी २५ ते ३० गावात हरिनाम सप्ताह वै.महादेव महाराज जगताप महाराज यांनी जन्मभुमीची निष्काम सेवा केली.चंदना प्रमाणे झिजुन भक्तीचा,परमार्थाचा मळा फुलविला.१९९५ काळात जीप घेतली होती.संपुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला होता. संगमेश्वर ते पैठण पायी दिंडी वै.महादेव महाराज यांनी सुरु केली.सर्वात मोठी दिंडी आहे.वाळवांटत महादेव महाराज जगताप यांचा मान होता.पहाडी आवाज असणारे नामांकीत महाराज होते.निरपेक्ष व निष्काम परमार्थ सेवा केली.सत्यस्वरुप व प्रमाणिक सेवा कधीच वाया जात नाही हा नितीचा नियम आहे.निष्काम होऊन कर्म केले तर कैवल्य मोक्षाला प्राप्त होता येत असते.देहाला विसरुन जनक राजाने कर्म केले.विदेही राजा म्हणून जनक राजाला ओळखले जाते.यादव अणि कौरव संपवुन श्री कृष्ण निजधामाला गेले.चोख कर्म करुन मोक्ष मिळविता येतो.कर्म शरीर करीत असते आत्मचिंतन मन करत असते असे ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी म्हणाले.उपस्थितीतांचे ह.भ.प.
शिवाजी महाराज जगताप यांनी आभार मानले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या