Ticker

6/recent/ticker-posts

दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलतो ; जाती पातीच्या भिंती तोडा ........ ह.भ.प.डाॕ.जलाल महाराज सय्यद .......... महावीर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्याला प्रचंड गर्दी

आष्टी (प्रतिनिधी) पुर्ण ज्ञान झालेला माणुस असतो आणि अपुर्ण ज्ञान असलेला धर्माच्या चौकटीत बांधलेला असतो.धर्माच्या आश्रयाने राजाला रहावे लागते. माणसाचा स्पर्श झाला तर चिमण्या चिमणीच्या पिलाला टोचुन टोचन मारतात.ज्या दिवशी देव सर्वांना दिसेल त्यादिवशी त्याला त्रास होईल.माणुस माणसाला संपवितो फक्त धर्माचे कवाडे बंद करा.दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलतो ;जाती पातीच्या भिंती तोडा असे आवाहन प्रसिद्ध रामकथाकार ह.भ.प.डाॕ.जलाल महाराज सय्यद यांनी केले. आष्टी येथे सकल जैन समाजाच्यावतीने आयोजित भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक २०२५ भगवान महावीर स्वामी जयंतीच्या निमित्ताने " अरे माणसा माणसा " या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, सुखलाल मुथ्था,दिनकर तांदळे,डाॕ.मधुकर हंबर्डे,डाॕ.विलासराव सोनवणे,डॉ.नदीम शेख,ॲड.वाल्मिक निकाळजे,आण्णासाहेब चौधरी,संतोषशेठ मेहेर,संजयशेठ मेहेर, डाॕ.श्रीकांत कुलकर्णी, पत्रकार उत्तम बोडखे,शरद तळेकर, प्रविण पोकळे,शरद रेडेकर, मुजाहद्दीन सय्यद,राजेंद्र लाड, बाळासाहेब थोरवे,हरीष हातवटे,सोपान जोगदंड,सुनिल मेहेर,विजय बोगावत,विजयशेठ मेहेर, सरपंच संजय थोरवे, किशोर झरेकर,तैय्यब सय्यद, सय्यद शफीभाऊ, शादुल्ला बेग (टाटा),भाऊसाहेब कोकणे, राहुल मुथ्था,प्रा.मोहन धोंडे,अमोल भंडारी,प्रीतम बोगावत,अक्षय हळपावत, पारस मेहेर,श्रेयस मेहेर,अक्षय कासवा,प्रीतम कासवा, शिवलाल कटारिया,निखील कटारिया,कपिल अग्रवाल, सचिन कदम ,अमोल कदम आदि सामाजिक,राजकीय, धार्मिक,व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प. डाॕ.सय्यद जलाल म्हणाले की,जर तुमचं मनच स्वच्छ नसेल तर कुठे तिर्थयात्रेला जाऊन काय उपयोग ? त्यामुळेच आपण कोण आहोत ? हे अगोदर ज्ञात होणे गरजेचे आहे.माणूस प्रगतीसाठी प्रयत्न करत नाही तो अदोगतीसाठी जास्त प्रयत्न करत असून त्यामुळे प्रत्येकाने माणसातला माणूस ओळखला पाहिजे.मात्र आजच्या परिस्थितीत माणुस माणसाला मारतोय.मुस्लिम कुटुंबात जन्म झालेल्या डॉ.सय्यद जलाल महाराजांनी वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला आहे. राम नाम गजर करीत समाज प्रबोधन करात आहेत.शहरात गावात रामकथा करतात. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातीच्या करंजी खुर्द या गावचे डाॕ.सय्यद जलाल रहिवासी आहेत. तीन पिढ्यापासुन वारकरी संप्रदाय त्यांच्या घरात आहे. त्यांचे आजोबा,वडील वारकरी भजनी होते. रामायणावर त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. मराठी आणि हिंदी या भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.राम आणि अल्लाह वेगळे नाहीत.या सर्व धर्म सम भावाचा ते प्रचार प्रसार करतात.अल्ला व राम एकच असल्याचे अनेक दाखले देत त्यांनी आपल्या श्रुश्राव्य व्याख्यानाने उपस्थित आष्टीकरांचे मने जिंकले. सामाजिक सलोखा कसा असावा याचे अनेक मूर्तीमंत उदाहरण देत त्यांनी आपल्या व्याख्यानातून जाती पातीच्या भिंती दूर करा असा संदेश उपस्थितीना देत माणसाने माणसातला माणूस ओळ्खला तरच की माणुसकी जिवंत राहील असे " माणूस " या शब्दाला धरत एकात्मतेचे आवाहन करत अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिले.आपण लोकांचाच विचार करत बसत आहोत आणि आपले तसेच राहून जाते यांचा विचार आपण करत नाहीत. हे जग काल होत उद्या पण राहील आपण मात्र उपरे आहोत.हे लक्षात राहू द्या. आपल्यात बाहेरून आलेले लोक जातीवाद पसरवत आहेत. त्याकडे आपण लक्ष न देता आपल्यातली माणुसकी आपण जपणे काळाची गरज आहे. त्याच विचाराने राज्य व देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी मी आजपर्यत माणुसकीच जपत आलो आहे. आज माणसाकडे पद,प्रतिष्ठा,पैसा थोडा आला की माणूस माणुसकी विसरून वागतो. त्याचबरोबर जातीपातीच्या नावाखाली तो माणुसकी विसरून गेला आहे.ज्यावेळेस माणूस जात बाजूला ठेऊन माणसाकडे माणूस म्हणून पाहील.त्यावेळेस नक्कीच जात शिल्लक राहणार नाही असेही शेवटी डॉ.जलाल महाराज यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या