आष्टी (प्रतिनिधी)
परमार्थात आनंद हवा असेल तर गाथा,ज्ञानेश्वरीत रंगले पाहिजे. प्रयत्नाला प्रारब्दाची साथ असल्याशिवाय संसार होत नाही तसेच प्रयत्नाला कृपेच्या साथी शिवाय परमार्थ होत नाही.
परमार्थ बळजबरीने होत नसतो. आत्मकृपा,शास्र कृपा,संतकृपा आणि देवकृपा या चार कृपा असतात.
आत्मकृपेसाठी अगोदर माणसाच्या मनाच्या कृपेची गरज असते.मनाने कृपा केल्यावर परमार्थ समजेलच असे नाही.शास्राची कृपा संत वचनातुन होत असते.संत कृपेशिवाय परमार्थ करता येत नाही.


भारतीय संस्कृती कृतृज्ञ आहे. परमार्थात कृतृज्ञ असावे लागते.गंगा स्वताःबरोबर इतरांचे पाहते.गंगा ही गटार,नाले,नद्या यांना आपल्यात सामावुन घेत असते.
माणसाने कृतृघ्न असु नये कृतज्ञ असावे.
प्रयत्नाशिवाय प्रपंच नाही तसा
संतकृपेशिवाय परमार्थ नाही असे प्रतिपादन ह.भ.प.श्रीहरि चांगुणे महाराज यांनि केले.
आष्टी शहरातील वसंतनगर येथील श्री जगतगुरु तुकाराम महाराज मंदीरात सुरु असलेल्या ३७५ वा.त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी संत तुकाराम महाराज बीज अखंड विठ्ठल नाम सप्ताह सोहळ्यात ह.भ.प.श्रीहरि महाराज चांगुणे बोलत होते.
यावेळी ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज,सोनाजी बनकर, ह.भ.प.गोविंद पवार,अशोक डोके,संतोष बोरुडे,नन्नवरे सर,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,उध्दव विधाते,प्रा.सुभाष रासकर,मिसाळ सर,अशोक काकडे,किशोर महाराज,सोपान जोगदंड,सागर चौधरी,शिवाजी धोंडे,अमोल बळे, ह.भ.प.दादा महाराज चांगुणे, घनशाम खलासे,किसनराव रासकर,सचिन धोंडे,नवनाथ डोके,माजी सरपंच सौ. आदिकाताई लोखंडे,सौ.प्रतिभाताई जोगदंड,सौ.अनिता चौधरी,बाळासाहेब रासकर,नानासाहेब तवले,लाला महाराज राक्षे आदि मान्यवर उपस्थित होते.
आज शनिवारी ह.भ.प.डाॕ.विजय
कुमार फड यांचे हरिकीर्तन होणार आहे.रविवारी ह.भ.प.पांडुरंग जाधव गुरुजी यांचे सकाळी १० १२ यावेळात तर रात्री ह.भ.प.कडुभाऊ काटे (नेवासा) यांचे हरिकीर्तन होणार आहे.सोमवारी १० ते १२ यावेळात ह.भ.प.संतोष महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
0 टिप्पण्या