आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती महोत्सव २०२५ दि.१६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे.आज
रविवारी पहिली ते पचवी एक गट व सहावी ते नववी दुसरा गट या दोन गटात वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
सोमवारी दि.१७ फेब्रुवारी रोजी संगीत भजन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित केल्या आहेत.मंगळवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी सामुहिक नृत्य आणि पोवाडा सादरीकरण होणार आहे तर बुधवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकळी १० वा.शिव ध्वजारोहण,छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन व बक्षीस वितरण होणार आहे.सायंकाळी ५ वा.छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणुक होणार असल्याची माहिती शिवजयंती महोत्सव समितीने दिली.
0 टिप्पण्या