
आष्टी (प्रतिनिधी)
कथा,कादंबऱ्या,कविता लेखनाची प्रेरणा जिथून मिळते,जिथे लहानाचा मोठा झालेला आपला गाव,आपले खेडे,आई वडील,कधीतरी जावयास मिळणारा मामाचा गाव,तिथल्या माणसांचे मिळणारे प्रेम,लेखक,कवींना बरच काही देऊन जातात.मातीचा गंध,प्रेमाचा ओलावा,लेखणीला ऊब देणारा ठरतो.त्यामधूनच काहीतरी लेखन करण्याची उर्मी मिळते म्हणूनच प्रत्येक लेखक,कवींनी आपल्या गावाला,आई वडिलांना,मामाच्या गावाला लेखणीतून अजरामर केले असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.
आष्टी तालुक्यातील चिंचाळा या जन्मगावी ६० व्या. वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांकडून केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील चिंचाळाचे भूमिपुत्र प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ६० व्या.वाढदिवसानिमित्त चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्यावतीने चिंचाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींना टूथ ब्रश,टूथपेस्ट,बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना टूथ ब्रश,टूथपेस्ट आणि बिस्किट पुड्याचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका हेमलता तरटे,सरपंच पंडित कल्याण पोकळे, पोलीस पाटील गणपत पोकळे,जालिंदर पोकळे,महादेव पोकळे,शाळा समिती अध्यक्ष,माजी सरपंच दिगंबर पोकळे, माजी सरपंच अशोक पोकळे,डॉ.सय्यद हुमायुद्दीन,डॉ.सय्यद वलीयुद्दीन,शिक्षक शिक्षिका,दादासाहेब चव्हाण,दीपक म्हस्के,स्वाती खिलारे,वर्षा गळगटे,बेबी शेख,शबनम शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या