आष्टी (प्रतिनिधी)
३ जून २०१४ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत साहेबांच्या हक्काच्या बीड लोकसभेच्या जागेवर संघर्ष कन्या पंकजातईंनी डाॕ.प्रितमताई मुंडे यांना निवडणूक लढविण्यास लावली.प्रचंड चिंतन,मंथन करुन पंकजाताईंनी तो निर्णय घेतला होता.डॉ.प्रितमताई यांचं नाव सर्वानुमते निश्चित झालं. पोटनिवडणूक झाली.देशभरातील मताधिक्यांचे मोठ मोठे रेकॉर्ड मोडत डॉ.प्रितमताई खासदार झाल्या.अपघाताने राजकारणात आलेल्या या व्यक्तिमत्त्वाला राजकारणाचं बाळकडू घरातून होतंच परंतु मूळ वैद्यकीय क्षेत्रात आपलं करिअर करु पाहणाऱ्या मुंडेसाहेबांच्या या लेकीवर राजकारणात येण्याचा प्रसंग नियतीने आणला.माजी खा.डाॅ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे
( रेल्वेताई ) यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नेत्रदीपक कार्य केलेले आहे.बीडच्या " द बंग खासदार " म्हणुन नावलौकिक मिळविलेल्या माजी खा.डाॕ.प्रीतमतई मुंडे या कर्तुत्ववान नेतृत्वास उदंड आणि निरोगी दिर्घायुष्य मिळावे अशा भावना समाजसेवक विजय गोल्हार यांनी व्यक्त केल्या.
आष्टी तालुक्यातील महिंदा येथील संत महाराज नारायण विद्यालयात माजी खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक विजय गोल्हार यांच्या तर्फे विद्यार्थीना गोड जेवन,शाळेला संगणक संच व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या
विद्यार्थीसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी सरपंच बाळासाहेब गर्जे,यमाजी खंडागळे,पंढरीनाथ मिसाळ,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना गोल्हार म्हणाले की,जीवनात प्रत्येकच जण स्वतः ठरवलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करेल, याची शक्यता विरळ असते. विधात्याने जे काम ज्याच्या खांद्यावर दिलं त्याला ते करणं हे क्रमप्राप्त आहे.मिळालेली जबाबदारी डॉ.प्रितमताईंनी हसतमुखाने स्विकारत संघर्षकन्या पंकजाताईंच्या वडीलकीच्या सूचनेचे डाॕ. प्रीतमताईंनी पालन केले. ऊसतोड कामगारांचं अन् राज्यासह देशभरातील लाखो चाहत्यांचं दैवत असणाऱ्या स्व.गोपीनाथ मुंडेसाहेबांचं 'अ.नगर

-
बीड - परळी रेल्वे' हे मुख्य स्वप्न होतं.मुंडेसाहेबांसह अनेक नेत्यांनी,स्वातंत्र्य सैनिकांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण आयुष्य बीडचा रेल्वे हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खर्ची केलं.डॉ.प्रितमताई खासदार झाल्यावर या प्रश्नाची धूरा त्यांच्या खांद्यावर आली.तेंव्हा पहिल्याच वर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत एकाचवेळी तब्बल २८०० कोटी रुपयांचा विक्रमी निधी ' रेल्वेताईंनी' खेचून आणला होता असे ऐतिहासिक काम माजी खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांनी केल्याचे यावेळी गोल्हार यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार शाम शेकडे यांनी मानले.
0 टिप्पण्या