Ticker

6/recent/ticker-posts

मच्छींद्रनाथाच्या समाधी मंदिराची पुनर्बांधणी होणार .......... आ.सुरेश धस

आष्टी (प्रतिनिधी) धार्मिक निसर्ग व देवभूमी पर्यटन श्री क्षेत्र म्हणून मायंबा देवस्थानचा विकास सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते नाथपंथाचे आद्यनाथ बडेबाबा मच्छिंद्रनाथाचे मुख्यसमाधी मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामाचा प्रारंभ करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतल्याची माहिती मायंबा देवस्थानचे पदसिद्ध विश्वस्त आ.सुरेश धस यांनी दिली.मायंबा देवस्थान येथे विधानसभा निकालानंतर आ.सुरेश धस यांनी सहकुटुंब नाथाच्या पादुकाची महापूजा व संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सर,सचिव बाबासाहेब मस्के, कोषाध्यक्ष अध्यक्ष रमेश ताठे,बीड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णांत पानसंबळ,उपअभियंता एम.एस.निंबाळकर यांच्यासह प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वरिष्ठ अधिकारी व सर्व विश्वस्त उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीत आ.सुरेश धस मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल विविध कार्यकर्ते व भाविकांनी केलेल्या नवसाची पूर्तता करण्यात आली.विविध कामात अडथळे ठरणारे व हरकतीचे मुद्दे सामूहिक चर्चेतून निघाले निघाल्याने रस्त्याच्या कामाला लगेचच गती येणार आहे.आ.सुरेश धस म्हणाले की,पर्यटन विभाग तीर्थक्षेत्र विकास प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आधीच्या माध्यमातून २२ विकासकामे कोटीची प्रगतिपथावर आहेत लवकरच समाधी मंदिराची काम सुरू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य होणार आहे. मढी,वृद्धेश्वर, मायंबा अशी त्रिस्थळी यात्रा नाथभक्त पायी फिरत पूर्ण करतात.मायंबा देवस्थानाकडे
येणारे सर्वच रस्ते दु पदरी होणार आहेत. शनिशिंगणापूरच्या पूर्वीचे प्राचीन नाथकालीन शनीमंदिराभोवतीचे सर्व रस्ते व तिथून पाथर्डी तालुक्यात जाणारी रस्तेसुद्धा मजबूत केले जातील.मायंबा देवस्थानाचा विकास आराखडा तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या