
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी येथील छत्रपती शाहू महाराज अपंग संस्था आणि छत्रपती शाहु महाराज निवासी अपंग विद्यालयाचे संस्थाध्यक्ष सुखदेव पोकळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.आष्टी तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून १९९५ साली आष्टी येथे छत्रपती शाहू महाराज अपंग संस्थेची सुखदेव पोकळे यांनी सुरुवात केली.अपंगाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.त्यातूनच आज आष्टीत दिव्यांगांसाठी चार युनिट सुरू आहेत.दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी,
दिव्यांगांना शासकीय मदत व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी पोकळे हे प्रयत्नशील आहेत.
आष्टी येथील छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयात संस्थाध्यक्ष सुखदेव पोकळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या प्रारंभी दिव्यांगांचे आराध्य दैवत डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवराव पोकळे साहेब यांना वाढदिवसानिमित्त छत्रपती शाहू महाराज अपंग विद्यालय मूकबधिर विद्यालयाच्या वतीने संस्थेचे शिक्षक अमोल थोरवे, मुख्याध्यापक विजय झांजे,मुख्याध्यापक काकासाहेब थोरवे, डॉ.योगेश शिंदे,शिक्षक कैलास जाधव , आण्णासाहेब थोरवे, कैलास लखे ,सुधीर तोडकर,भाऊसाहेब ननवरे,बाळासाहेब घोडके,पांडुरंग पोकळे , बंडू राऊत,परमेश्वर सोनवणे,दीपक कोल्हे , अंकुश राठोड,संभाजी शिरसाठ,अंकुश तांदळे, आदिनाथ दळवी,जोस्ना आजबे,संगीता घोलप, दीपक सायकड,मस्के आप्पासाहेब,सुरेश फुंदे , शेखर पगडे,रामहरी साप्ते ,संदीप कर्डिलेयांनी सत्कार केला.तसेच डोईठाण येथील शाहु महाराज कनिष्ठ महाविद्यालचे प्राचार्य बाळासाहेब राख, प्रा.जी.के.देवकर,प्रा. एस.एस.वाळके,प्रा.एस.बी.महाजन,प्रा.ए.पी. थोरवे,प्रा.ए.ए.शेख, श्रीमती झांबरे मॅडम (सेविका) यांनी सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सुखदेव पोकळे म्हणाले की, दिव्यागांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते.दिव्यांग विद्यार्थ्यांना चालना मिळावी.या उद्देशाने आपल्या संस्थेकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून त्यांना चालना देण्याचे काम करीत आहोत. अभिष्टचिंतन सोहाळ्यानिमित्त विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी करण्यासाठी शरद तळेकर,शिवाजी नलावडे,बाळासाहेब घोडके,सुधीर शिंदे,शरद तळेकर,शिवाजी रणसिंग,सतीष आवारे, सोमीनाथ करदुले, परमेश्वर पाखरे,मारुती पवार,पुष्पा राऊत, रजिया बेग शिक्षक,कला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या