Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच बांधवाचे पाठीराखे ग्रामीण भागातील रांगडे नेतृत्व आ.सुरेश धस यांना कॅॅबिनेट मंत्री करण्याची राज्य सरपंच परिषदेची मागणी

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी मतदार संघाचे नवनियुक्त आ. सुरेश धस यांचा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्यावतीने सत्कार करण्यात आला.थेट जनतेतून सरपंच असावा यासाठी आणि शिर्डी येथे सरपंच, उपसरपंच यांचा भव्य मेळावा घेऊन सरपंच बांधवाचे प्रश्न सोडविण्यासाठी आ.सुरेश धस यांचे मोठे योगदान असल्याने व ग्रामीण भागातील प्रश्नाची जान असणाऱ्या आ.सुरेश धस यांना कॅॅबिनेट मंत्री करण्याची मागणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केली आहे काकडे यांनी म्हंटले आहे आ.धस यांनी सभागृहात सातत्याने गावगाड्याचे प्रश्न मांडले आहेत. ते ग्रामीण भागातील एक रांगडे नेतृत्व असून ग्रामीण भागाच्या समस्या त्यांना माहित चांगल्या प्रकारे माहित असून त्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे आ. धस हे मंत्री व्हावेत अशी राज्यातील सरपंच बांधवाची इच्छा असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी म्हंटले आहे कोरोना काळात,दुष्काळी परिस्थिती, उत्तराखंड मधील नैसर्गिक परिस्थितीत त्यांनी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे काम केले आहे.त्यामुळे खऱ्या जनमा णसातील आशा नेतृवाला मंत्री मंडळात संधी मिळणे गरजेचे आहे.या सत्कार समारंभ प्रसंगी राज्य विश्वस्त तथा आष्टी तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुधीर आबा पठाडे ,रोहिदास पवार,शहाजी सापते,सतीश ढवळे,संदीप खाकाळ ,अंगद शिंदे,दिंडे,मार्कंडे,पवार,परिवंत गायकवाड,हरिभाऊ केरुळकर,युवराज तरटे, बाळू चवरे,अशोक इंगवले यांच्यासह अनेक सरपंच,उपसरपंच उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या