
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार ॲड.निवृत्तीराव उगले (वय ९५ ) यांचे आज सोमवार दि.२८ आक्टोबर रोजी पहाटे निधन झाले.१९६७ ते १९७२ याकाळात या मतदार संघाचे आमदार होते तर १९७४ ते १९८० या काळात ते विधान परिषदेचे आमदार राहिले.कडा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, भूविकास बँकेचे संचालक यासह अन्य शासनाच्या विविध समितीवर त्यांनी काम पाहिले.अत्यंत शांत,संयमी आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती.आष्टी नागरी सह.पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा आष्टी तालुका डाॕक्टर असो.चे तालुकाध्यक्ष डाॕ.विलासराव सोनवणे यांचे माजी आ.उगले हे सासरे आहेत.आष्टी नागरी पतसंस्थेचे ते जेष्ठ संचालक व मार्गदर्शक होते. सोमवार दि.२८ आक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आष्टी बस स्थानक जवळ वैकुंठधामात अंत्यविधी झाली. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, श्री. अमितजी घावटे साहेब ,राष्ट्रवादीचे उमेदवार शेख महेबुब,ॲड. चंद्रकांत आजबे,माजी न्यायाधीश वसंतराव पोकळे,नायब तहसिलदार बाळदत्त मोरे,अनंत हंबर्डे,ॲड. नरसिंह जाधव, सतिषआबा शिंदे, नियामत बेग,विजय गोल्हार,बलभीमराव सुंबरे,ॲड.साहेबराव म्हस्के,संतोषशेठ मेहेर,ॲड.बाबुराव अनारसे,डाॕ.मधुकर हंबर्डे,अशोक साळवे, आण्णासाहेब चौधरी, किशोर हंबर्डे ,प्रा.ढुबे, डाॕ.आर.के. सानप,सागर आमले, सुखलाल मुथा,चेअरमन बाळासाहेब शिंदे, ईकबाल पेंटर,बबनदादा शिंदे,बबनराव खंडागळे, प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे, छानबाई ढोबळे, वकील संघाचे अध्यक्ष जेवे,अंकुश चव्हाण,नगरसेवक ज्ञानदेव राऊत,भीमराव गुरव,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,ॲड.कांतीलाल गव्हाणे, ॲड.आर.टी. जगताप,राकेश हंबर्डे, बाळासाहेब झांबरे, महालिंग निकाळजे, विठ्ठलराव मुटकुळे, बाळासाहेब शेंदुरकर,काकासाहेब पोकळे, प्रशांत पोकळे, संभाजी काकडे, आनंद शेलार,घनशाम खलासे, अविनाश निंबाळकर पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंदआदि सामाजिक , राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या