Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी मतदार संघात डाॕ. शिवाजी राऊत यांना राष्ट्रवादी ओबीसी चेहरा देणार का ?

आष्टी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीची धामधुम जोरात सुरु झाली आहे. आष्टी विधानसभा मतदार संघात उमेदवारीची रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) गट ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत यांनी धनगर समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी घेतली.यामधून समाजाची दशा व दिशा याविषयावर चिंतन करण्यात आले.धनगर समाजाला मिळणारे स्थान आणि यामधून समाजाची होणारी कुचंबना यावर विचार मंथन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.आजपर्यंत आपणसर्व समाजाला सहकार्य केले आता ओबीसी समाजातील उमेदवाराला सहकार्य करून विधानसभेची जागा ही धनगर समाजातील ओबीसीचा एक आश्वासक चेहरा म्हणून डॉ.शिवाजी राऊत यांनी लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात आली आली. यावेळी सांगण्यात आले की,या मतदार संघामध्ये धनगर समाजाच्या मतांची संख्या ही सुमारे ४६ हजार आहे. त्यामुळे धनगर समाजातील उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी डॉ.शिवाजी राऊत यांनी सांगितले की,आजपर्यंत अनेकवेळा आश्वासने देऊन आम्हाला थांबवण्यात आले कधी विधान परिषदेवर तर कधी राज्यपाल कोट्यातून आमदार व करू,कधी महामंडळ देऊ अशी फक्त आश्वासने देण्यात आली परंतु आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.आजपर्यंत आम्ही सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन काम करत आहोत अनेक वेळा सर्वांना सहकार्य करून आमदार केलेले आहे. त्यामुळे आता आमच्या समाजातील आमदार झाला पाहिजे. ही भूमिका सर्व समाजाची आहे त्यामुळे आपण पक्षाकडे विधान सभेसाठी उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्यावर विचारमंथन करण्यासाठी समाजातील सर्व घटकाला सोबत घेऊन या पुढच्या काळामध्ये आष्टी, पाटोदा,शिरूर मतदार संघातील धनगर समाजाचा मोठा मेळावा घेऊन आपण राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत असे डाॕ.राऊत यांनी सांगितले.यामुळे मात्र आष्टी विधानसभा मतदार संघातील वातावरण यामुळे ढवळून निघणार आहे.या पुढच्या काळामध्ये डॉ.शिवाजी राऊत काय भूमिका घेणार ? याकडे सर्व राजकीय पक्षांचे व मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी माजी जि.प.सदस्य रामहरी महारनवर,ज्येष्ठ नेते पांडुरंग गावडे,सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघुले, सरपंच नामदेव सानप, सरपंच बाबू दिंडे,कडा कृ.उ. बा.समिती संचालक रामदास शेंडगे,अंगद भोंडवे, सुनील काळे, झुंबर मदने,भाऊसाहेब ढोरमारे,परसराम पारखे युवराज खटके, हनुमंत भिसे,नाना ढोरमारे,दादा पारखे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या