
वआष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर सेवा
समिती,वसंतनगर येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन नूकतेच पार पडले.यावेळी उपस्थित अनेक
कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संजय शेळके 'नवरात्र व भेसळ',मुकुंद लगड श्री
शक्तीचा महिमा, 'बळीराजा',बाबासाहेब घोरपडे 'नवरात्रीचा गरबा,'जीवन,बाबासाहेब
शिकारे 'माझा देश महान',विश्वेश्वर बोडखे कोऱ्या अक्षराचा फळा,सौ.लक्ष्मी लांडगे
गौर माझी ही सगुणा, जडली प्रीत,गोकुळ गायकवाड कामधेनु,'द्या हो द्या बायको द्या',
बाबासाहेब राजगुरू अब्रूचा बाजार,जान्हवी मंडलिक 'पास हो पोरा स्पर्धेच्या
युगात','जात्या वरची ओवी',ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे 'न दिसणारा बाप',' आई',
प्रकाश खंडागळे 'भक्तिरस','आडोसा',रंगनाथ राळेभात 'सटवीचे अक्षर',अरे मानवा करू नको
माझं माझं, दादासाहेब पठारे पेंटर 'गोधडी' अशा प्रकारेच्या स्वरचित रचना बीड,
अहिल्यानगर,सोलापूर व रत्नागिरी या भागातुन आलेल्या स्वरबद्ध केल्या यावेळी
श्रोत्यांनी उत्तम प्रकारे दाद देऊन रचनांचा अस्वाद घेतला. राज्यस्तरीय काव्य
संमेलन ज्येष्ठ कवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली १४ कविरत्न व पत्रकार रत्न
पुरस्कार ह.भ.प.दानवे महाराज,ह.भ.प. घनशाम खलाशे महाराज,डॉ.विलास सोनवणे,सरपंच सौ.
शालनताई मुळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी डॉ.विलास सोनवणे मनोगत व्यक्त
करतांना म्हणाले की, दोन तास कवितेसोबत घालविले आहेत.वेळ कसा गेला समजले
नाही.समाजाचे कारूण्य आणि वेदना काव्यातून व्यक्त होतात.ह.भ.प. दानवे महाराज
म्हणाले, 'वेद नाही कळाले तरी चालतील ;पण वेदना कळाव्यात' वेदना कळाल्या की संवेदना
जाग्या होतात,संवेदना जाग्या झाल्या की, कवितेचा जन्म होतो. खरोखर सर्वंच कवी,
कवयित्रीची काव्ये वाखाणण्याजोगी आहेत. कवी संमेलनात मुर्शदपूर सरपंच सौ.शालनताई
अशोक मुळे यांनी भुषविले. यावेळी माजी सरपंच डॉ.जालिंदर वांढरे,अध्यक्ष महादेव
लांडगे,जेष्ठ कवी स्वागताध्यक्ष प्राचार्य घनश्याम खलाशे , आदेश निमोणकर,
सौ.किर्तीताई प्रवीण धोंडे,ग्रा.पं.सदस्य मुर्शदपुर-कासारी,सौ. चंद्रकलाताई नालकोल,
माजी सरपंच ,सौ. अदिकाताई लोखंडे, प्रा.अनंत हंबर्डे,ॲड. रमाकांत भोकर,डॉ. विलासराव
सोनवणे डॉ.गणेश पिसाळ, माजी चेअरमन सुरेश पवार, त्रिंबक इजारे,नवनाथ डोके,किसन
रासकर, प्राचार्य एम.डी.पडोळे, प्रकाश खेडकर, मुक्ताताई बन्सोडे, सौ.कृष्णाबाई
धोंडे,सौ. गंगाताई हजारे , गोरक्षनाथ टकले, सुभाष लाळगे, सौ.शोभाताई वामन
फाजगे,सौ.माई रघुनाथ पोकळे,पत्रकार तालुकाध्यक्ष आण्णासाहेब साबळे, पत्रकार,संतोष
नागरगोजे, पत्रकार शेख समीर आदी उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचलन कवी विश्वेश्वर
बोडखे यांनी तर त्रिबंक इजारे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या