Ticker

6/recent/ticker-posts

बीडला मसाप मराठवाडा साहित्य परिषद वर्धापनदिन नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते उद्घाटन

 

 








मराठवाडा साहित्य परिषदेचा ८१ वा. वर्धापनदिन रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी बीड येथे संपन्न होत आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यलेखक प्रा.अजित दळवी हे उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे आणि कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मसपच्या बीड शाखेचे अध्यक्ष सतीश साळुंके यांनी दिली. 
          वर्धापनदिनाचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपन्न होणार असून सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ५ दरम्यान बीड जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन संपन्न होणार आहे. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रेखा ढेरे-घोलप या करणार आहेत.कवी संमेलनात प्रभाकर साळेगावकर,अनिल गव्हाणे,सीमा गुंड,विठ्ठल जाधव,अरुण पवार,बाळासाहेब गर्कल,सत्यप्रेम दगड, प्रतिभा थिगळे,जगन्नाथ कांबळे,अनिल होळकर, मुकुंद राजपंखे,वसीयुद्दीन परवाना,श्रीराम गिरी,माया सोनवणे, हरीश हातवटे,नागेश शेलार,बाळासाहेब झोडगे, संगीता औटी, शेख अजीमौद्दिन मेजर, हनुमंत घाडगे, अनिता पैठणकर, कविता कराड, सीता केंद्रे, खेळबा काळे, गौरी देशमुख,स्मिता निमगावकर,संगीता जाधव,अनुपमा मोटेगावकर,निशा चौसाळकर,सुरेखा खेडकर,मंजुषा कुलकर्णी,वैभव साळुंखे,गौरी देशमुख, स्मिता लिमगावकर,खेळबा काळे व दिवाकर जोशी हे जिल्ह्यातील कवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात सहभागी होऊन आपल्या कविता सादर करणार आहेत.जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून कवी संमेलनाचा व वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मसाप बीड शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके,कार्यवाह प्राचार्य जे.एम. पैठणे,उपाध्यक्ष मंगेश रोटे,अण्णासाहेब गडदे,दीपक सरवदे,प्रशांत मुळे आदि कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या