आष्टी (प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेस वाव मिळावा म्हणून बेलगाव येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ बेलगाव व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. या स्पर्धा शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता बेलगाव येथे होतील. या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत.
प्रथम पारितोषिक ७०१ रु.,द्वितीय पारितोषिक ५०१ रु, तृतीय पारितोषिक ३०१ रु,
पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ एक बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे विषय ठेवण्यात आलेले आहेत.अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य, मानव जातीवरील कोविड-१९ संकट,महामानव छत्रपती शिवाजी महाराज, मोबाईल वापर योग्य की अयोग्य,शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा, ग्रामीण भागातील मुली गुणवत्तेमध्ये मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. वरीलपैकी एका विषयावर स्पर्धकाने बोलायचे आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. स्पर्धा मराठी भाषेत होतील. प्रत्येक शाळेतून दोन स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. बेलगाव परिसरातील महिंदा, हातोला, पाटसारा, डोईठाण, नागतळा, सांगवी ( पाटण), बावी, किन्ही, बीडसांगवी, केरूळ, बेलगाव, जळगाव, ब्रह्मगाव येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. प्रत्येक स्पर्धकास सहा अधिक एक मिनिटे वेळ दिला जाईल.भाषणांचा क्रम लॉट पद्धतीने ठरवला जाईल, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील , स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांची नावे शाळांनी दि.१३ सप्टेंबर पर्यंत ॲड. सीताराम पोकळे, संयोजक यांच्याकडे पाठवावेत असे आवाहन रेणुकाई गणेश मंडळाचे अध्यक्ष शहाजी पोकळे सर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या