Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा हरिनारायण शाळेस धनश्री पतसंस्थेमार्फत ५० हजार रु.च्या मदतीचा चेक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील आष्टा हरीनारायण माध्यमिक शाळेस आष्टी तालुक्यातील नामांकित व सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या आष्टी येथील धनश्री नागरी सहकारी पतसंस्थे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे व धनश्री पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे,संचालक स्वप्नील धोंडे यांच्या हस्ते आष्टा शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पठाडे ,उपाध्यक्ष साईनाथ गळगटे, गावचे सरपंचपती गणेश माळवे, गौतम बन्सी रोकडे, गणेश गळगटे, शाळेचे मुख्याध्यापक जगताप मच्छिंद्रनाथ,रघुनाथ मुटकुळे,श्रीरंग खोकले ,नामदेव भिसे, सोमनाथ वाळके, बापू शिंदे,उमेश झांबरे,राजेंद्र भागवत, डॉ.चव्हाण अनिता,द्रौपदी गवळी ,सुषमा जाधव, मनिषा नाईकनवरे,तुषार पवार, दिगंबर आष्टेकर, लालासाहेब बळे, सुभाष बांगर,मधूकर धूमाळ यांच्या उपस्थित ५० हजार रुपयांचा चेक आज शाळेत येऊन आष्टा ह.ना.शाळेस प्रदान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,आष्टा ह.ना. शाळेतील विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत ,शाळेने मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेला आष्टी तालुक्यात प्रथम क्रमांक व बीड जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळालेला आहे स्वच्छता शिस्त अतिशय सुंदर असून पुढील काळात शाळेचा नावलौकिक वाढावा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही यात हातभार लावून मदत करत आहोत.यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश झांबरे यांनी तर सूत्रसंचालन सोमनाथ वाळके यांनी केले तर आभार बापू शिंदे यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या