Ticker

6/recent/ticker-posts

कु.श्रेया राजेंद्र खेडकरचे राज्यस्तरीय अभिरूप परीक्षेत घवघवीत यश

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील वसुंधरा प्राथमिक शाळेतील कु.श्रेया राजेंद्र खेडकर हीने ( इयत्ता दुसरी) राज्यस्तरीय अभिरूप परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.श्रेयाचे वडिल प्राथमिक शिक्षक असल्याने ते आष्टी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.आष्टी येथेच राहत आहेत.कु. श्रेयाने काही महिन्यापूर्वीच मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये १५० पैकी १४८ गुण घेऊन इयत्ता दुसरीमध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचे बक्षीस वितरण मराठी मालिका मिसेस मुख्यमंत्री यातील अभिनेत्री अमृता धोंगडे यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे देण्यात आले.आता पुन्हा एकदा श्रेयाने राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा (IAS) २०२४ मध्ये १५० पैकी १४६ गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळवला.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.तिच्या या यशाबद्दल मार्गदर्शक वर्गशिक्षिका सौ.वर्षा जाधव मॅडम व संस्थेचे संस्थाध्यक्ष मनोरंजन धस,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या