Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे साहित्यिक लक्ष्मण दिवटे यांच्या " उसवण " या ग्रामीण कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य: परिषद पुणे शाखा अहमदनगर यांचा आ.स्व.राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय कथासंग्रह साहित्य पुरस्कार आष्टीचे साहित्यिक लक्ष्मण दिवटे यांच्या "उसवण" या कथासंग्रहाला पद्मश्री पोपटराव पवार, सौ. सुनिताराजे पवार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सौ.सुनिताराजे पवार,आ. मोनिकाताई राजळे,आ.सत्यजित तांबे,आ.संग्रामभैय्या जगताप, जयंत येलुलकर,मेधाताई काळे, साहित्यिक सुरेश पाटील,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगरचे अध्यक्ष किशोर मरकड यांच्या हस्ते कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.लक्ष्मण दिवटे हे आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावचे रहिवाशी आहेत. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडुळेवस्ती येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उसवण हा त्यांचा पहिलाच ग्रामीण कथासंग्रह महाराष्ट्र - राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेतून पायगुण प्रकाशन अमरावती यांनी जानेवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार पुणे,महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचा शंकर पाटील स्मृती कथासंग्रह पुरस्कार, सनराइज कथासंग्रह पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लातूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचा उल्लेखनीय साहित्य पुरस्कार,तितिक्षा इंटरनॅशनलचा उत्कृष्ट कथासंग्रह साहित्य पुरस्कार असे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्यिक लक्ष्मण दिवटे यांच्या यशाबद्दल युवानेते सागर धस, पत्रकार उत्तम बोडखे , संपत ढोबळे, विकास साळवे,अण्णा साबळे, चेअरमन सुभाष गणगे, अर्जुन नरवडे,लहु करडुळे,सोमनाथ करडुळे,विजय डुकरे माजी सरपंच बबनराव करांडे,अवधूत गुप्ते, पंडित गोकुळ नरवडे , गणेश नरोडे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी सोमनाथ करडुळे, ग्रामपंचायत सदस्य बीड़ सांगवी पोपटराव करडुळे मारुती करडुळे ज्ञानदेव करडुळे, जालीदर मस्के सर,गोरख करांडे सर, पप्पु नरवडे, बापुसाहेब गणगे मुकादम,डिगांबर नरवडे, जिजाबा करडुळे, बिभीषण करडुळे, मल्हारी करडुळे, रफिक शेख ,अजित ढोबळे, घनश्याम पुढारी ,जिल्हा परिषद शाळा प्राथमिक- बीडसांगवी अध्यक्ष, सदस्य, करांडेवस्ती शाळा अध्यक्ष,सदस्य, करडुळेवस्ती अध्यक्ष व सदस्य ,जिल्हा परिषद शाळा प्राथमिक बीडसांगवी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, करडुळेवस्ती सर्व शिक्षक आष्टी तालुक्यातील सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या