आष्टी (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळालेले प्रचंड बहुमत आणि तेलंगणा राज्यामध्ये वाढलेली मतांची टक्केवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीची आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या संघटन कौशल्याची पावती आहे.आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे भारतीय जनता पार्टीचे ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील याची नांदी आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये मध्यप्रदेश,





राजस्थान आणि छत्तीसगड येथील भारतीय जनता पार्टीच्या विजयाबद्दल विजय उत्सव साजरा करताना ते बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड.साहेबराव मस्के महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाची उपाध्यक्ष ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे,युवा नेते संतोषभैय्या चव्हाण,रिपाई तालुकाध्यक्ष अशोक साळवे,
बाबा गर्जे,बाजीराव वाल्हेकर,
बबनराव औटे,चेअरमन अरुण सायकड,उत्तम बोडखे,बाबु कदम,
सदाशिव दिंडे,प्रदीप धोंडे गणेश धोंडे,भीमराव विधाते,एस.बी.
साळवे,अभय गर्जे,राहुल निकाळजे,मुकुंद धोंडे आदि मान्यवर,भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालय समोर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताशीबाजी करून भारतीय जनता पार्टीचा विजय उत्सव साजरा केला.
पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,पाच राज्याच्या निवडणुका घोषित झाल्या त्यावेळी भारतीय जनता पार्टी विषयी अपप्रचार झाला मात्र भारतीय जनता पार्टीचे संघटन कौशल्य आणि भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्ता यांनी अथक परिश्रम करून मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सत्ता मिळवण्यात मोठे कामगिरी केले आहे.भारत देशाचे पंतप्रधान हे संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय असून संपूर्ण जगाला ते सध्या मार्गदर्शन करत असून जणूकाही जगाचे पंतप्रधान आहेत इतके ते लोकप्रिय झालेले आहेत त्यांच्या प्रगतिशील आणि दूरदर्शीपणाच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत प्रगतीपथावर असून थ्री ट्रिलियन डॉलर्सकडे आपला अर्थव्यवस्थेचा प्रवास सुरू आहे असे सांगत पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या कामाकडे पाहून त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे रणनीती कार समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी कुशल तेने संघटन कौशल्य दाखवून या तीनही राज्यांमध्ये विजय मिळवलेला आहे तेलंगणामध्ये देखील एक विधानसभा सदस्य असताना आता त्याठिकाणी १० झालेले आहे. मतांची टक्केवारी देखील वाढलेली आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची पीछेहाट झाली होती तरी देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीमध्ये तेलंगणा राज्यामध्ये चार खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या ठिकाणी अत्यंत किरकोळ जागा काँग्रेसला मिळाले होते आणि भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आले होते आता तर या तिने चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मताधिक्यामध्ये मोठी वाढ झाली असून मतांची टक्केवारी देखील वाढलेली असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ३०० पेक्षा जास्त जागा विजयी होऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार भारत देशामध्ये स्थापन होईल यामध्ये शंका नाही त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच मतदारांशी संपर्क साधून नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीच्या शासनाची कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावीत असे आवाहनही त्यांनी माजी आ.भीमराव धोंडे यावेळी केले.यावेळी मुर्शदपूरचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण,तालुकाध्यक्ष ॲड.
साहेबराव म्हस्के,शंकर देशमुख,
बाबासाहेब गर्जे यांची समयोजीत भाषणे झाली.संचलन व आभार भाजपनेते शंकर देशमुख यांनी मानले.
*चौकट*
-------------
बीड जिल्हा भाजपचे सचिव शंकर देशमुख यांची मध्यप्रदेशात महाराष्ट्र प्रदेश भाजपने सोनकच्छ विधानसभा मतदार संघात विस्तारक म्हणून नियुक्ती केली होती.याठिकाणे भाजपचे डाॕ.राजेश सोनकर हे २४ हजार ५०० मतांनी विजयी झाले आहेत.
शंकर देशमुख यांचे या मतदार संघातुन निवडुन आलेले आ.डाॕ.
राजेश सोनकर आणि पदाधिका-यांनी अभिनंदन केले.
********************
0 टिप्पण्या