Ticker

6/recent/ticker-posts

पोपट काळे यांच्या "काजवा" पुस्तकास राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर

आष्टी (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील प्रा.रसूल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था महागावाच्यावतीने नुकतेच निवडक साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध साहित्य प्रकारातुन पूर्व शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या " काजवा " या पुस्तकाची निवड समितीने राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे संस्थाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक प्रा.रसूल सोलापुरे यांनी पुरस्कारासंबंधी घोषणा नुकतीच केली.पोपट काळे यांच्या "काजवा" या आत्मकथनाच्या एकाच वर्षात पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून मराठी साहित्यात विद्यार्थी,पालक,शिक्षक,पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना प्रोत्साहन व प्रेरणा देणा-या काजवा साहित्यकृतीस आजपर्यंत २ राष्ट्रीय आणि ९ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या